Jasprit Bumrah Record In Australia : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला. ब्रिस्बेनच्या गाबा कसोटी सामन्यात भारताच्या स्टार गोलंदाजाने खास विक्रमाला गवसणी घातली. तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात मिचेल स्टार्कच्या रुपातील विकेट्सह जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियन मैदानात कसोटीत ५० विकेट्स पूर्ण केल्या. फक्त १० कसोटी सामन्यात त्याने हा खास विक्रमी डाव साधला आहे. कपिल देव यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करणारा बुमराह दुसरा गोलंदाज ठरला.
१४७ वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते बुमराहनं करून दाखवलं
कसोटी कारकिर्दीत ४३ वा कसोटी सामना खेळताना जसप्रीत बुमराहनं आपल्या खात्यात १९१ विकेट्सची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत जे कुणालाही जमलं नाही ते त्याने साध्य केले आहे. बुमराह हा कसोटीत सर्वात कमी सरासरीसह १९० धावा घेणारा गोलंदाज आहे.
बुमराहचा 'सिक्सर'
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील प्रत्येक सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीची झलक दाखवून दिलीये. ब्रिस्बेनच्या मैदानात एका बाजूला अन्य गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत असताना जसप्रीत बुमराहनं पुन्हा एकदा भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. २८ षटके गोलंदाजी करताना त्याने ६ विकेट्स घेतना ९ षटके निर्धाव टाकली.
कपिल पाजींना केलं ओव्हरटेक
जसप्रीत बुमराह आधी कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियात विकेट्सची फिफ्टी साजली केली होती. ११ कसोटी सामन्यात त्यांनी ५१ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहनं १० कसोटी सामन्यातच हा डाव साधलाय. यादरम्यान त्याची सरासरी ही २४.५८ अशी आहे. ऑस्ट्रेलियन मैदानता सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रम आता बुमराहच्या नावे झाला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बुमराहची कामगिरी
पर्थ कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची कॅप्टन्सी करताना जसप्रीत बुमराहनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात त्याने ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये बुमराहनं ४ विकेट्स घेतल्या होत्या.