...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय?

बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटरची हवा, बुमराह अन् विराटवर पडला भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:50 IST2024-12-26T10:45:18+5:302024-12-26T10:50:25+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND 4th Test Father of Bumrah And Virat Kohli Sam Konstas Wikipedia page gets doctored after onslaught against India at MCG | ...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय?

...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास (Sam Konstas) याने मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या टीम इंडियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून धमाक्यात पदार्पण केले. वयाच्या १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करताना त्याने दमदार अर्धशतक झळकावले. पहिला सामना खेळताना त्याने बिनधास्त अंदात जी फटकेबाजी केली ती अनेकांना आश्चर्यचकित करून सोडणारी होती. त्याचा तोरा पाहून युवा क्रिकेटवीरच्या कौतुकाचा विकिपीडिया पेजवर रंगलेला सोहळाही खास आणि लक्षवेधी ठरतोय. १९ वर्षांच्या क्रिकेटसाठी Wikipedia वर "Father of Bumrah/Kohli" असा ट्रेंड पाहायला मिळाला. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय? त्यासंदर्भातील स्टोरी

बुमराहच्या गोलंदाजीवर पेश केला सुरेख फटकेबाजीचा नजराणा

सॅम कोन्स्टास याने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने आपल्या भात्यातून काढलेला स्कूप्स शॉट पाहून भारतीय गोलंदाजासह क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करून सोडणारा होता. परफेक्ट स्कूप शॉटसह क्लासिक पुल शॉटच्या कमालीच्या मिश्रणासह या युवा फलंदाजाने बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार मारले. जड्डूच्या चेंडूवर बाद होण्याआधी त्याने ६५ चेंडूत ६० धावांची खेळी केली.

..अन् युवा क्रिकेटर बुमराह-विराटवर पडला भारी, Wikipedia वर उमटल्या कल्पनेपलिकडच्या भावना

 


जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने ज्या अंदाजात बिनधास्त फटकेबाजी केली, ते पाहून एका वापरकर्त्यानं क्रिकेटरच्या Wikipedia पेजवर Father of Bumrah असा उल्लेख करत युवा क्रिकेटचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. यात फक्त जसप्रीत बुमराहच नाही तर विराट कोहलीचाही समावेश आहे. यामागचं कारण विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास यांच्यातही मैदानात खडाजंगी पाहायला मिळाली. सॅम कोन्स्टास मैदानात उतरल्यावर सिराज त्याच्याविरुद्ध स्लेजिंगचा मारा करताना दिसला. पण युवा बॅटरनं त्यावेळी कोणताही रिप्लाय न देता बॅटिंगवर फोकस केला. पण मैदानात ज्यावेळी विराटनं खांदा मारला त्यावेळी हा सॅम कोन्स्टास थेट विराटच्या अंगावर गेला. याच गोष्टीचा दाखला देत युवा क्रिकेटरच्या Wikipedia पेजवर काही युझर्संनी Wikipedia वर  Father of Virat या अंदाजात कल्पनेपलिकडच्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

धाडसी खेळी अन् युवा क्रिकेटरचा कोहली विरुद्ध भिडण्याचा तोराही ठरला लक्षवेधी 

जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली हे दोन्ही भारतीय स्टार क्रिकेटर क्रिकेट जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. बुमराह गोलंदाजीला येतो त्यावेळी विकेट कशी वाचवायची असा प्रश्न भल्या भल्या फलंदाजांना पडतो. पण ऑस्ट्रेलियाच्या युवा बॅटरनं त्याच्या गोलंदाजीवर अगदी धाडसी अंदाजात बॅटिंग केली. विराट कोहली विरुद्धचा त्याने जो तोरा दाखवला त्याचीही सध्या  सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. 

Web Title: AUS vs IND 4th Test Father of Bumrah And Virat Kohli Sam Konstas Wikipedia page gets doctored after onslaught against India at MCG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.