AUS vs IND 4th Test Massive Blow For India Before Tea KL Rahul Clean Bowled : मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या मोठ्या धावंसख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात एकदमच सुमार झालीये. रोहित शर्मानं पहिल्या डावातील दुसऱ्या षटकात विकेट गमावल्यावर लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाला आकार दिला. ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना पॅट कमिन्सनं चहापानाच्या ब्रेकआधी टीम इंडियाला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का दिला. एका अप्रतिम चेंडूवर पॅटनं त्याला क्लीन बोल्ड केले. भारतीय संघाने ५१ धावांवर आपली दुसरी विकेट गमावली आहे. हा सीन पॅट कमिन्स जोमात अन् टीम इंडिया कोमात, असाच काहीसा आहे. भारतीय संघ अजूनही ४२३ धावांनी पिछाडीवर आहे.
पॅट कमिन्सनं KL राहुलच्या संयमी खेळीला लावला ब्रेक
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात लोकेश राहुलनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. त्याने मैदानात तग धरून दमदार बॅटिंगचा नजराणाही पेश केला. पण मेलबर्न कसोटी सामन्यात त्याच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पुन्हा बदल करण्यात आला. रोहितच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावल्यावर तो मैदानात आला. भारतीय संघाची पहिली विकेट ही दुसऱ्या षटकातच पडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चेंडूवरचाच लोकेश राहुलला सामना करावा लागलात. त्याने धमकही दाखवली. ४० हून अधिक चेंडू खेळून त्याने २४ धावांची खेळी केली. पण भारताच्या डावातील १५ व्या षटकात पॅट कमिन्सनं त्याला चकवा दिला. अन् त्याच्या संयमी खेळीला ब्रेक लागला. टी ब्रेकआधी पडलेल्या या विकेट्समुळे दुसरे सेशन ऑस्ट्रेलियाच्या नावे झाले. लोकेश राहुलनं ४२ चेंडूत २४ धावा करताना ३ चौकार मारल्याचचे पाहायला मिळाले.
त्याच्या क्रमवारीतील बदल टीम इंडियाला अडचणीत आणणारा?
लोकेश राहुल एका चांगल्या चेंडूवर आउट झाला. पण त्याने या अल्प खेळीतही नव्या चेंडूवर मैदानात थांबून खेळण्याची जी आवश्यकता होती ते काम करून दाखवले. यशस्वी जैस्वालच्या साथीनं त्याने दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. जर हीच परिस्थिती तो ओपनिंगला आल्यावर दिसली असती तर भारतीय संघासाठी ती अनुकूल परिस्थितीत ठरली असती. पण रोहितच्या बदलाच्या प्रयोगामुळे गणितच बिघडले आहे.
Web Title: AUS vs IND 4th Test Massive Blow For India Before Tea KL Rahul Clean Bowled Pat Cummins 2nd Wicket After Rohit Sharma Melbourne Boxing Day Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.