Join us  

रोहित-विराटचं नाही टेन्शन; KL राहुलकडे टॅलेंट! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी काय म्हणाला गंभीर?

इथं एक नजर टाकुयात गौतम गंभीरनं ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भाष्य केलेल्या ५ प्रमुख मुद्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 1:11 PM

Open in App

Gautam Gambhir's Press Conference Ahead Of Australia Tour : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक याने पत्रकार परिषदेत घेतली. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौरा खूप महत्त्वपूर्ण आहे. इथं एक नजर टाकुयात गौतम गंभीरनं या दौऱ्याआधी कोणत्या प्रमुख मुद्यावर भाष्य केले त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह करणार टीम इंडियाचे नेतृत्व

रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे पर्थ कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत भारतीय संघाचा कॅप्टन कोण हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. गौतम गंभीरनं या प्रश्नावर भाष्य करताना सध्याच्या घडीला उप कॅप्टन असणारा जसप्रीत बुमराहच संघाची कमान सांभाळताना दिसेल, असे म्हटले आहे.

रोहितसंदर्भातील प्रश्नाच गंभीरकडेही नव्हतं उत्तर

आगामी दौऱ्यासाठी पाच भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. संघातील उर्वरित मंडळी सोमवारी ऑस्ट्रेलियाला दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. रोहित शर्मा संघासोबत असणार का? या प्रश्नाच उत्तर गौतम गंभीरकडेही नव्हते. तो म्हणाला की, रोहित संघासोबत ऑस्ट्रेलियाला येणार आहे की नाही त्यासंदर्भात माझ्याकडे माहिती नाही. तो उपलब्ध असेल अशी अपेक्षा करतो.

रोहित-विराटचं टेन्शन नाही

रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी अजिबात चिंतेचा विषय नाही. भारतीय क्रिकेटसाठी या दोघांनी मोठे योगदान दिले आहे. भविष्यातही त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळेल, असा विश्वास गौतम गंभीरनं व्यक्त केला आहे.

केएल राहुलची पाठराखण

लोकेश राहुल हा सातत्याने अपयशी ठरताना पाहायला मिळाले. या परिस्थितीतही गौतम गंभीरनं पुन्हा त्याची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुल हा प्रतिभावंत खेळाडू आहे. डावाची सुरुवात करण्यापासून ते सहाव्या क्रमांकापर्यंत कुठंही तो फिट बसतो. ही त्याच्यातील जमेची बाजू आहे, असे म्हणत गंभीरनं त्याचा बचाव केल्याचे पाहायला मिळाले.

राहुल आणि ईश्वरन ओपनिंगचा पर्याय रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात कोण करणार? हा प्रश्नही चर्चेचा विषय ठरतोय. यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना गौतम गंभीरनं लोकेश राहुल आणि ईश्वरन हे दोन पर्याय ओपनिंगसाठी असतील असे सांगितले. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघगौतम गंभीररोहित शर्मालोकेश राहुल