IND vs AUS : कधी, कुठे अन् किती वाजता रंगणार डे नाईट कसोटी सामना? वाचा सविस्तर

गुलाबी चेंडूवरील सामन्याआधी भारतीय संघाने सराव सामन्यात दमदार कामगिरी करून  दाखवली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:45 PM2024-12-02T15:45:22+5:302024-12-02T15:46:49+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND All you need to know for the Border-Gavaskar day-night Test Adelaide | IND vs AUS : कधी, कुठे अन् किती वाजता रंगणार डे नाईट कसोटी सामना? वाचा सविस्तर

IND vs AUS : कधी, कुठे अन् किती वाजता रंगणार डे नाईट कसोटी सामना? वाचा सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ कॅनबेराहून अ‍ॅडिलेडला रवाना झाला आहे. पर्थ कसोटीत २९५ धावांच्या विजयासह मालिकेची सुरुवात दिमाखात केल्यावर आता टीम इंडियासमोर प्रकाशझोतातील कसोटी सामन्याचे चॅलेंज आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅडिलेडच्या मैदानातील सामान हा दिवस रात्र खेळवण्यात येणार आहे. गुलाबी चेंडूवरील सामन्याआधी भारतीय संघाने सराव सामन्यात दमदार कामगिरी करून  दाखवली आहे. 

सराव पक्का की कच्चा?

अ‍ॅडिलेडच्या मैदानात रंगणाऱ्या पिंक बॉल टेस्टआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध जो सराव सामना खेळवण्यात आला त्यात पावसाचा व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले. परिणामी हा सराव सामना दोन दिवस खेळण्याऐवजी एका दिवसात प्रत्येकी ५-५० षटकांचा झाला. थोडक्यात पिंक बॉल कसोटी ही वनडे फॉर्मेटमध्ये खेळली गेली. त्यामुळे भारतीय संघाने सामना जिंकला असला तरी अ‍ॅडिलेड कसोटीचा सराव पक्का की कच्चा? हा एक प्रश्न उरतोच. भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक डे नाईट टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाने एकमेव डे नाईट टेस्ट ऑस्ट्रेलियाविरुद्धच गमावलीये. त्यामुळे भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यात एक वेगळेच चॅलेंज असेल.  

 कधी अन् कुठे अन् किती वाजता रंगणार IND vs AUS यांच्यातील दुसरा कसोटी सामना?

अ‍ॅडिलेडच्या मैदानातील कसोटी सामना हा मालिकेसह वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. हा सामना ६ डिसेंबरला अ‍ॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येईल. सामना दिवस रात्र खेळवण्यात येणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियात हा सामना दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार असला तरी भारतीय चाहत्यांना या सामन्याचा आनंद सकाळी ९ वाजल्यापासून घेता येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता दोन्ही संघातील कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. ९ वाजून ३० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.

३ सेशनमध्ये या वेळेत खेळवला जाईल सामना
 
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रातील खेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. ११ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या सत्राचा खेळ संपेल. उपहारासाठीच्या ४० मिनिटांच्या विश्रांतीनंतर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होईल. या सत्रातील खेळ दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत चालेल. २० मिनिटांच्या विश्रांतीनंतर २ वाजून ३० मिनिटांनी तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होईल. अखेरच्या सत्रातील खेळ  ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालेल.  

 

Web Title: AUS vs IND All you need to know for the Border-Gavaskar day-night Test Adelaide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.