ऑस्ट्रेलियाने संघाबाहेर काढलं, पठ्ठ्यानं BBLच्या गोलंदाजांवर काढला राग, केली तुफान धुलाई

Nathan Mcsweeney, AUS vs IND BGT, BBL 2024: कसोटी मालिकेत फ्लॉप ठरल्याने संघाबाहेर झालेल्या मॅकस्वीनीने संघाला मिळवून दिला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 18:40 IST2024-12-22T18:37:16+5:302024-12-22T18:40:58+5:30

whatsapp join usJoin us
Aus vs Ind Australian opener nathan mcsweeney shines in bbl after excluding against India BGT Test Series | ऑस्ट्रेलियाने संघाबाहेर काढलं, पठ्ठ्यानं BBLच्या गोलंदाजांवर काढला राग, केली तुफान धुलाई

ऑस्ट्रेलियाने संघाबाहेर काढलं, पठ्ठ्यानं BBLच्या गोलंदाजांवर काढला राग, केली तुफान धुलाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Nathan Mcsweeney, AUS vs IND BGT, BBL 2024: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी २० डिसेंबर रोजी आपला संघ जाहीर केला होता. या संघाची घोषणा झाल्यानंतर युवा सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला मोठा धक्का बसला. खराब कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले. या निर्णयाने नॅथन काहीसा नाराज झाला, पण त्याने पुन्हा बॅट हाती घेतली. ऑस्ट्रेलियन संघातून बाहेर पडल्यानंतर मॅकस्वीनी आता बिग बॅश लीगमध्ये (BBL) परतला. बीबीएलमध्ये तो ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळताना दिसला. त्याने झंझावाती अर्धशतक झळकावून संघाला विजयी केले.

मॅकस्वीनीने ठोकलं धमाकेदार अर्धशतक

अडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यातील बिग बॅश लीगच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अडलेड स्ट्रायकर्स संघाने ६ गडी गमावून १७४ धावा केल्या. तर मॅकस्विनीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ब्रिस्बेन हीटने शेवटच्या चेंडूवर धावांचे लक्ष्य गाठले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत फ्लॉप झालेल्या नॅथनची बॅट बीबीएलमध्ये तळपळी. त्याने ४९ चेंडूत ७८ धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले.

मॅकस्वीनीची दमदार फटकेबाजी, पाहा VIDEO-

१९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने घेतली मॅकस्विनीची जागा

नॅथन मॅकस्विनीची जागा १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने घेतली आहे. मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीतून कॉन्स्टास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पर्थ कसोटीनंतर ऑस्ट्रेलिया PM इलेव्हन आणि भारत यांच्यातील सराव सामन्यात कॉन्स्टासने शतक झळकावले होते. नॅथन मॅकस्विनीने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ६ डावात केवळ ७२ धावा करू शकला. त्याच्या बॅटमधून एकही आले नाही. जसप्रीत बुमराहने त्याला ४ वेळा बाद केले.

Web Title: Aus vs Ind Australian opener nathan mcsweeney shines in bbl after excluding against India BGT Test Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.