Join us

शुबमन गिलसाठी कायपण! तरुणीनं थेट रोहितला केली विनंती; कॅप्टननं असा दिला रिप्लाय (VIDEO)

शुबमन गिलची चाहती असलेल्या या तरुणीचा  व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:35 IST

Open in App

 Biggest Female Fan of Shubman Gill    बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. भारतीय संघ या कसोटीसामन्यासाठी कसून सराव करत आहे. भारतीय खेळाडूंची एक झलक पाहता यावी, यासाठी टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशन वेळीही स्टेडियमवर चाहते गर्दी करत असल्याचे पाहायला मिळे. या वेळी मेलबर्नमध्ये एका तरुणीनं लक्षवेधून घेतले. शुबमन गिलसाठी कायपण...असं म्हणत या तरुणीनं थेट कॅप्टन रोहित शर्मालाच शुबमन गिलला बोलवण्याची विनंती केल्याचा सीन पाहायला मिळाला. या तरुणीचा  व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

शुबमन गिलची झलक पाहण्यासाठी तरुणीनं थेट रोहितला केली विनंती, कॅप्टननं असा दिला रिप्लाय 

भारतीय संघातील खेळाडूंच्या नेट प्रॅक्टिस सेशन दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात काही खेळाडू नेट्समध्ये प्रॅक्टिस करत असताना रोहित शर्मा स्टाप मेंबर्ससोबत प्रेक्षक बसलेल्या स्टँडच्या दिशेने येताना दिसून येते. यावेळी स्टँडमध्ये बसलेली एक तरूणी रोहित शर्माला ओरडून ओरडून शुबमन गिलला बोलवण्याची विनंती करताना दिसते. विशेष म्हणजे रोहित शर्माही तिला कुठंन बोलवू, असा रिप्लाय देताना या व्हि़डिओमध्ये दिसून येते.

पायानं नीट चालता येईना, पट्ट्या बांधून शुबमनसाठी स्टेडियमवर पोहचली तरुणी

 शुबमन गिलची चाहती असलेल्या या तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ही तरुणी शुबमन गिलच्या भेटीसाठी मनातील भावना व्यक्त करताना दिसते. त्याची छोटी झलक काल पाहिली. पण त्याला भेटायचं आहे. पायाला दुखापत झालीये. तरी फक्त त्याच्यासाठी  पायाला पट्टी बांधून इथपर्यंत आल्याचे ती या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते. आय लव्ह यू शुबमन गिल, असं म्हणत त्याची भेट नक्की होईल, असा विश्वासही ही तरुणी व्हिडिओमध्ये व्यक्त करताना दिसून येते. 

टॅग्स :शुभमन गिलरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाऑफ द फिल्ड