AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा

जाणून घेऊयात  टीम इंडियात वर्णी लागलेल्या  ३ चेहऱ्यांसदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 01:10 PM2024-10-26T13:10:56+5:302024-10-26T13:13:48+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND Border Gavaskar Test series Team India squad Abhimanyu Easwaran Pacer Harshit Rana, all-rounder Nitish Reddy selected for Australia Tour | AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा

AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs IND Border-Gavaskar Trophy Three New Faces In India Squad:  बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Team India for Border-Gavaskar Trophy) अंतर्गत रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघात ३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ रणजी स्पर्धेत द्विशतक झळकवणाऱ्या अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या नावाचा विचार करेल, अशी चर्चा रंगली होती. पण 'ओल्ड इज गोल्ड' हा फॉर्म्युला आजमावण्यापेक्षा टीम इंडियाने नव्या चेहऱ्यांवर भरवसा दाखवल्याचे दिसते. जाणून घेऊयात  टीम इंडियात वर्णी लागलेल्या  ३ चेहऱ्यांसदर्भातील खास स्टोरी

...तर अभ‍िमन्यु ईश्वरन कॅप्टन रोहितच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये करेल एन्ट्री 

Abhimanyu Easwaran
Abhimanyu Easwaran

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात अभिमन्यु ईश्वन या नव्या चेहऱ्याचा समावेश केल्याचे दिसून येते. २९ वर्षीय अभिमन्यू ईश्वनरनची टीम इंडियात वर्णी लागलण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०२२ मध्ये तो बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी  भारतीय संघासोबत दिसला होता. पण अद्याप त्याला पदार्पणाची संधी काही मिळालेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या बॅटरनं सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला बाजूला ठेवून त्याला बॅकअप ओपनरच्या रुपात टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव एखाद्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल तर हा खेळाडू भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळू शकते.     

एकमेव सीम ऑलराउंडरच्या रुपात नितीश रेड्डीला पसंती

Nitish Reddy
Nitish Reddy

 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने स्पिन ऑल राउंडरच्या रुपात आर. अश्विन, रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. याशिवाय सीम ऑल राउंडरच्या रुपात २१ वर्षीय नितीश रेड्डीला पसंती देण्यात आली आहे. बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या या खेळाडूलाही ऑस्ट्रेलियातील मैदानात कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते.   

बुमराहसह ४ जलदगती गोलंदाजांच्या यादीतही एक नवा चेहरा

Harshit Rana
Harshit Rana

बुमराहशिवाय भारतीय संघात मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि  हर्षित राणाला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.  २२ वर्षीय हर्षित राणानं दुलीप कंरडक स्पर्धेत भारत 'ड' संघाकडून खेळताना दोन वेळा ४ विकेट्स घेतल्या होत्या.  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये  २४.७५ च्या सरासरीनं त्याच्या खात्यात ३६ विकेट्सची नोंद आहे. 

कसा आहे भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा?
 

  • २२ ते २६  नोव्हेंबर: पहिला कसोटी सामना, पर्थ
  • ६ ते १० डिसेंबर: दुसरा कसोटी सामना, अ‍ॅडिलेड 
  • १४ ते १८ डिसेंबर: तिसरा कसोटी सामना, ब्रिस्बेन
  • २६ ते ३० डिसेंबर: चौथा कसोटी सामना , मेलबर्न
  • ०३ ते ०७ जानेवारी:  पाचवा कसोटी सामना, सिडनी

 

Web Title: AUS vs IND Border Gavaskar Test series Team India squad Abhimanyu Easwaran Pacer Harshit Rana, all-rounder Nitish Reddy selected for Australia Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.