Shubman Gill's Adelaide Test भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानात रंगणार आहे. पिंक बॉल कसोटी सामन्यात शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार का? हा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. पर्थ कसोटी सामन्याआधी सरावा दरम्यान हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटीला मुकला होता. तो दुसऱ्या सामन्यात खेळणार की, नाही हा मुद्दाही सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.
शुबमन गिल रिकव्हरीसंदर्भात मोठी अपडेट्स
भारतीय क्रिकेट संघ बुधवारी सकाळी पर्थहून कॅनबेराला रवाना झाला. यावेळी शुबमन गिल स्पॉट झाला असून डाव्या हाताच्या अंगठ्याला कोणतीही पट्टी वैगेरे दिसली नाही. त्यामुळेच तो दुखापतीतून रिकव्हर झाला आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात तो खेळणार की नाही असा प्रश्न अनेक चाहत्यांना सतावत आहे.
एका पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दावा केला आहे की, "टीम इंडिया सकाळी पर्थहून कॅनबेराला उड्डाण करत असताना शुभमन गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला कोणत्याही प्रकारची पट्टी दिसली नाही." याचा अर्थ शुबमन गिल अधिक जलद रिकव्हर झालाय, असं दिसते. पण दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघ दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे, त्यासाठी तो उपलब्ध नसेल, अशीही बातमी चर्चेत आहे. कारण त्याला १४ ते १५ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे गिलच्या खेळण्याबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसते. बीसीसीआयकडून अपडेट्स येत नाही तोपर्यंत ही गोष्ट गुलदस्त्यातच राहिल.
रोहित शर्मा खेळणार हे फिक्स; शुबमन गिलची जागा घेणाऱ्या पडिक्कलचा पत्ता कट होणार हे जवळपास कन्फर्म
पिंक बॉल कसोटीसाठी शुबमन फिट नसेल तर लोकेश राहुल त्याच्या जागेवर खेळताना दिसू शकते. कारण पहिल्या सामन्याला मुकलेला रोहित शर्मा पुन्हा संघात कमबॅक करतोय. तोच डावाला सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीत देवदत्त पडिक्कलचा पत्ता कट होऊ शकतो. पर्थ कसोटी सामन्यात तो शुबमन गिलच्या जागेवर खेळताना दिसला होता.