IND vs AUS : बुमराह 'फर्स्ट क्लास'; पण आमचे फलंदाजही 'वर्ल्ड क्लास'; कॅरीनं सांगितला गेम प्लान

आशा आहे की, आम्ही त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात यशस्वी ठरू.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:25 AM2024-12-04T11:25:07+5:302024-12-04T11:27:42+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND Border-Gavaskar Trophy Alex Carey reveals plans to negate Fantastic Jasprit Bumrah in pink-ball Test in Adelaide | IND vs AUS : बुमराह 'फर्स्ट क्लास'; पण आमचे फलंदाजही 'वर्ल्ड क्लास'; कॅरीनं सांगितला गेम प्लान

IND vs AUS : बुमराह 'फर्स्ट क्लास'; पण आमचे फलंदाजही 'वर्ल्ड क्लास'; कॅरीनं सांगितला गेम प्लान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs IND Border-Gavaskar Trophy  : आमचा संघ एकजूट आहे आणि शुक्रवारपासून रंगणाऱ्या दिवस- रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजीचा सामना करण्यासाठी आम्ही चांगल्या रणनीतीने मैदानात उतरू, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक- फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी याने व्यक्त केला. बुमराहने बॉर्डर-गावसकर चषक मालिकेतील पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका निभावली होती.

आम्ही त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात यशस्वी ठरू

कॅरीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, 'बुमराह नक्कीच शानदार गोलंदाज आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. आमचे फलंदाजही जागतिक स्तराचे असून, ते नेहमीच यशस्वी होण्याचा मार्ग शोधून काढतात. आम्ही बुमराहच्या गोलंदाजीचे विश्लेषण केले आहे. आशा आहे की, आम्ही त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात यशस्वी ठरू. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने त्याच्याविरुद्ध चांगली आक्रमकता दाखवली होती.'

आमचा संघ एकजूट

पराभवानंतर जोस हेझलवूडने ऑस्ट्रेलियन संघात दोन गट पडल्याचे संकेत दिले होते. याबाबत कॅरी म्हणाला की, 'जर तुम्ही फलंदाजीबद्दल विचाराल, तर प्रत्येक जण शानदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येकाचाच मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असतो आणि जर यामध्ये यश आले नाही, तर नक्कीच निराशा येते. पण, आमचा संघ एकजूट आहे. आम्हाला सर्वांना फलंदाजीची संधी मिळते आणि आम्ही सर्व जण मोठी खेळी करण्यास उत्सुक असतो. मला विश्वास आहे, आमचे खेळाडू यशस्वी कामगिरी करतील.'

खेळपट्टीवर तग धरा! अ‍ॅडम गिलख्रिस्टचा सल्ला 

येथे रंगणाऱ्या दिवसरात्र कसोटीत जसप्रीत बुमराहच्या  नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजीचा सामना करणे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरेल. या गोलंदाजीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी फलंदाजांनी जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहावे, असा मोलाचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दिला आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले होते.

लाबुशेनला संघात कायम ठेवा, कारण...

गिलख्रिस्टने मार्नस लाबुशेनला संघात कायम राखण्याबाबतही सांगितले. तो म्हणाला की, 'मार्नसवर खेळपट्टीवर टिकून राहण्याची जबाबदारी होती. त्याने ५०हून अधिक चेंडूंचा सामना करत चांगला प्रयत्न केला. जर कसोटीत तुम्ही ५० अधिक चेंडूंचा सामना करत असाल, तर तुमची वाटचाल योग्य दिशेने सुरू असते. मार्नसला आठवण करून द्यावी लागेल की, तो कौशल्यपूर्ण फलंदाज आहे. मला विश्वास आहे की, त्याच्या आजूबाजूचे लोक असेच करत असणार, मार्नसने आपल्या सरावावर विश्वास ठेवावा. गिलख्रिस्ट पुढे म्हणाला की, 'मार्नस धावा काढण्याचा मार्ग शोधू शकला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना एकत्रितपणे पुढाकार घेऊन धावा काढव्या लागतील. यामुळे धोका पत्करला जाईल; पण धोका पत्करूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता.'
 

Web Title: AUS vs IND Border-Gavaskar Trophy Alex Carey reveals plans to negate Fantastic Jasprit Bumrah in pink-ball Test in Adelaide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.