Join us  

विराट कोहलीला गोलंदाजी करताना काय असतं फिलिंग? स्टार्कनं शेअर केली त्यामागची गोष्ट

या स्टार गोलंदाजाने विराट कोहलीसंदर्भात मोठ वक्तव्य केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 5:25 PM

Open in App

भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी रंगणारी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही दोन्ही संघासाठी खूपच महत्त्वपूर्ण असेल. या मालिकेआधी दोन्ही संघ आणि संघातील खेळाडूंसंदर्भातील गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या ताफ्यातील खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मत व्यक्त करत आहेत. यात आता मिचेल स्टार्कच्या वक्तव्याची भर पडली आहे. या स्टार गोलंदाजाने विराट कोहलीसंदर्भात मोठ वक्तव्य केले आहे. 

विराट विरुद्धच्या लढाईसंदर्भात स्टार्कचं मोठ वक्तव्य 

ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने भारतीय संघातील स्टार बॅटर विराट कहोली विरुद्धच्या लढाईसंदर्भात बिनधास्त मत मांडले.   स्टार स्पोर्स्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्टार्क म्हणाला की, "मी विराट कोहली विरुद्धच्या लढाईत नेहमीच गोलंदाजीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. यामागचं कारण हे की,  आम्ही दोघे एकमेकांविरुद्ध खूप खेळलो आहे. दोघांच्यात  चांगली टक्कर होते. काही वेळा मी त्याची विकेट्स घेतलीये. त्याने माझ्या गोलंदाजीवर खूप धावाही केल्या आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांविरद्ध खेळण्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करतो." असे तो म्हणाला आहे. 

पर्थच्या मैदानातून होईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत 

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानातून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पर्थच्या मैदानाशिवाय अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनीच्या मैदानात कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. यादरम्यान विराट वर्सेस स्टार्क यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.  

विराट वर्सेस स्टार्क यांच्यातील टक्करमध्ये कोण ठरलंय भारी?

विराट कोहली आणि मिचेल स्टार्क आतापर्यंत ३७ डावांत एकमेकांसमोर आले आहेत.  मिचेल स्टार्कनं फक्त ५ वेळा विराट कोहलीची विकेट घेतली आहे. दुसरीकडे विराट कोहलीने त्याच्या विरुद्ध उत्तम सरासरीने धावा कुटल्या आहेत. स्टार्कविरुद्ध बॅटिंग करताना विराटची सरासरी ८१.४० च्या घरात आहे. ४६ चौकार आणि ६ षटकारांसह कोहलीने या ऑस्ट्रेलियन गोलंदाजा विरुद्ध ४०७ धावा ठोकल्या आहेत. 

 

 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ