वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजयी सलामी दिली. पर्थच्या ऑप्ट्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभवाच पाणी पाजत टीम इंडियाने इतिहास रचला. पण सुरुवातीला संघातील खेळाडूंची धाकधूक वाढली होती. ऐतिहासिक विजयानंतर कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहनं पराक्रम करण्याआधी टीम इंडिया दबावात होती, ही गोष्ट शेअर केली आहे.
पहिल्या डावात टीम इंडिया फसलेली, पण...
जसप्रीत बुमराह म्हणाला की, अनुभव खूप मोलाचा असतो. पण विश्वास ही त्यापेक्षाही महत्व्वाची गोष्ट असते. ज्याच्या जोरावर तुम्ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सहज साध्य करू शकतो. पहिल्या डावानंतर आम्ही दबावात होतो. पण यातून बाहेर पडून सामना जिंकल्याचा खूप अभिमान वाटतो, असे तो म्हणाला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव १५० धावांत आटोपला होता. भारतीय संघ या सामन्यात मागे पडेल, असे चित्र निर्माण झाले होते. पण गोलंदाजांनी खास करून बुमराहने पुढाकर घेत कांगारुंना बॅकफूटवर ढकलले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १०४ धावांत गारद करत टीम इंडियाने ४६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी आपला जलवा दाखवला आणि ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे टार्गेट ठेवले.
काय म्हणाला बुमराह?
यशस्वी जैस्वाल ठरला कार्यवाहू कॅप्टनच्या मनातली मॅन ऑफ द मॅच विनर
दोन्ही डावात सर्वोत्तम गोलंदाजीमुळे बुमराहला या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. जर या सामन्यात सामनावीर तुला निवडायला सांगितले असते तर तू कुणाची निवड केली असतीस? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावेळी बुमराहनं यशस्वी जैस्वालचं नाव घेतलं. जैस्वाल हा आक्रमक खेळी करण्यासाठी ओळखला जातो. पण पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना त्याने १६१ धावांच्या खेळीत आपला डिफेन्सिव्ह अप्रोच दाखवला. त्याची ही इनिंग कौतुकास्पद आहे, असेही बुमराह म्हणाला.