WTC Final : टीम इंडियाची हॅट्रिक हुकली! ऑस्ट्रेलियानं सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली

गत हंगामात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत चांदीची गदा उंचावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 09:45 IST2025-01-05T09:40:42+5:302025-01-05T09:45:15+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND Team India Loss Test In Sydney Australia Qualify For The ICC World Test Championship At Lord's Against South Africa | WTC Final : टीम इंडियाची हॅट्रिक हुकली! ऑस्ट्रेलियानं सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली

WTC Final : टीम इंडियाची हॅट्रिक हुकली! ऑस्ट्रेलियानं सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील सिडनीच्या मैदानातील पराभवासह टीम इंडियानं मालिका ३-१ अशी गमावली. या पराभवासह सलग तिसऱ्यांदा  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची आशाही संपुष्टात आली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघानं दशकभरानंतर बॉर्डर गावसकर स्पर्धेत टीम इंडियाला शह देत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठलीये. लॉर्ड्सच्या मैदानात ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल खेळताना दिसतील. ११ जून २०२५ रोजी हा फायनल सामना रंगणार आहे. गत हंगामात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत चांदीची गदा उंचावली होती. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनल खेळताना दिसेल.

Web Title: AUS vs IND Team India Loss Test In Sydney Australia Qualify For The ICC World Test Championship At Lord's Against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.