Team India WTC final qualification scenario: न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताला ३-० असा व्हाईटवॉश दिला. मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत अव्वल स्थान गमावले आहे. यासोबतच WTC फायनलचा मार्गही कठीण झाला आहे. आता रोहित शर्माच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. तिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाला कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे असेल तर ही मालिका ४-० अशी जिंकावी लागेल. तसेच ४-१ ने जिंकली तरीही आशा कायम राहिल. पण भारतीय संघाने ही कसोटी मालिका गमावली तरीही भारतीय संघ WTC फायनलच्या शर्यतीत कायम राहील. समजून घेऊया यामागचे गणित...
ऑस्ट्रेलियाचा ४-० पराभव करून भारत सहज गाठेल अंतिम सामना
जर भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत केले, म्हणजेच ४ विजय आणि १ कसोटी अनिर्णित राहिली, तर भारताची एकूण टक्केवारी गुण ६५.७९ टक्के होतील. असे झाल्यास भारतीय संघाची अंतिम फेरी गाठणे जवळपास निश्चित होईल.
ऑस्ट्रेलियाशी भारत हरला तर... समीकरण कसे असेल?
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका गमावली तरीही काही समीकरणांच्या आधारावर भारताला अंतिम फेरी गाठता येऊ शकेल. मात्र यासाठी आम्हाला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. जाणून घ्या गणित...
- ऑस्ट्रेलियाने भारताला ३-२ ने हरवले तर...
- न्यूझीलंड-इंग्लंड मालिका १-१ अशी बरोबरीत सुटायला हवी.
- दक्षिण आफ्रिकेची श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबतची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटायला हवी.
- ऑस्ट्रेलियाची श्रीलंका मालिका ०-० अशी अनिर्णित राहायला हवी.
ही सर्व समीकरणे जुळून आली तर अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरी भिडतील.