Steve Smith ची विकेट पडली अन् रिकामे खिसे दाखवत कोहलीनं उडवली ऑस्ट्रेलियाची खिल्ली

बॅटिंग करो ना करो...विराट कोहली फिल्डवर काही ना काही करुन चर्चेत येतोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 07:49 IST2025-01-05T07:47:37+5:302025-01-05T07:49:20+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND Virat Kohli Mocks SCG Crowd With Sandpaper Gesture After Steve Smith's Dismissal Watch Video | Steve Smith ची विकेट पडली अन् रिकामे खिसे दाखवत कोहलीनं उडवली ऑस्ट्रेलियाची खिल्ली

Steve Smith ची विकेट पडली अन् रिकामे खिसे दाखवत कोहलीनं उडवली ऑस्ट्रेलियाची खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs IND Virat Kohli Mocks SCG Crowd With Sandpaper Gesture : सिडनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे नेतृत्व करताना विराट कोहली अन् ऑस्ट्रेलियन चाहत्यांमध्ये सँडपेपरसंदर्भातील खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा दुसरा डाव १५७ धावांत आटोपला अन् ऑस्ट्रेलियन संघ  १६२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला.  या धावांचा बचाव करण्यासाठी जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया मैदानात उतरली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

किंग कोहलीकडे कॅप्टन्सी अन् त्यानं चाहत्यांकडे इशारा करत उडवली ऑस्ट्रेलियाची खिल्ली 

 
 

बुमराहऐवजी विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. पहिल्या सत्राच्या ब्रेक आधी ऑस्ट्रेलियनं संघानं आपल्या दुसऱ्या डावात १३ षटकांच्या खेळात ७१ धावांत ३ विकेट्स गमावल्या आहेत. स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर कोहलीनं आपल्या खास अंदाजानं लक्षवेधून घेतलं.  तिसऱ्या दिवसाच्या खेळातील लंच ब्रेकआधी विराट कोहलीने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) जमलेल्या गर्दीची थट्टा करणारी कृती केली. रिकामा खिसा दाखवत त्याने ऑस्ट्रेलियन चाहत्यांसोबत सँडपेपरचा खेळ खेळला.

कोहलीचा रिकामा खिसा अन् त्यामागं  दडेलेली सँडपेपरची गोष्ट

कोहलीची ही कृती ऑस्ट्रेलियाच्या अब्रूची लख्तरं काढण्यातला प्रकार होती. कारण याचा संबंध  २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान न्यूलँड्स येथे झालेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणाची आठवण करून देणारा होता. कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टने बॉलवर सँडपेपर वापरल्याने क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाची फजिती झाली होती. सँडपेपरचा वापर अन् बॉल टेम्परिंगच्या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदीचा कारवाईही केली होती.
 

Web Title: AUS vs IND Virat Kohli Mocks SCG Crowd With Sandpaper Gesture After Steve Smith's Dismissal Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.