Virat Kohli Started His Test Preparation Behind The Scene Photo : भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली यानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी सुरु केली आहे. पर्थमध्ये पोहचल्यापासून ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी त्याला डोक्यावर घेतल्याचा सीन पाहायला मिळत आहे. किंग कोहलीसह टीम इंडियाचे स्वागत करताना इंग्रजी दैनिकानं चक्क हिंदी आणि पंजाबी भाषेत मथळा दिल्याची गोष्टही चांगलीच चर्चेत आहे. विराट कोहली टीममधील अन्य सदस्यांआधी ऑस्ट्रेलियात पोहचला होता. पण पहिल्या दिवशी झालेल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये त्याची झलक काही दिसली नव्हती. अखेर दुसऱ्या दिवसाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये तो सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन'चा माहोल, त्यातून विराटचा फोटो झाला लीक
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबरला रंगणाऱ्या या लढतीआधी भारतीय संघ पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (WACA) च्या स्टेडियम सराव करत आहे. हे स्टेडियम चौहू बाजूंनी नेट्सच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले आहे. स्टेडियमच्या परिसरातील माहोल हा अगदी लॉकडाउन सारखा आहे. त्यातूनही किंग कोहली प्रॅक्टिस करतानाचा फोटो लीक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वरिष्ठ खेळाडूंसह किंग कोहली सरावासाठी उतरला होता मैदानात
ट्रिस्टन नावाचा क्रीडा पत्रकार आपल्या एक्स अकाउंटवरुन सातत्याने भारतीय संघातील खेळाडूंच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. याच पत्रकाराने विराटची एक खास झलक शेअर केलीये. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीनं तयारी सुरु केली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंसह तो प्रॅक्टिस सेशनसाठी नेट्समध्ये आला होता, असा उल्लेख करत संबंधित पत्रकाराने विराट कोहलीचा प्रॅक्टिस दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. कोहली शॉर्ट ऑफ लेंथ आणि जलदगती गोलंदाजीवर मेहनत घेताना दिसून आले, असेही त्याने म्हटलं आहे.
किंग कोहलीकडून 'विराट' कामगिरीची अपेक्षा
घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या लाजिरावण्या पराभवानंतर भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच गणित बिघडलं आहे. ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी करून समीकरण अगदी सोपे करण्याचे मोठे चॅलेंज टीम इंडियासमोर आहे. यात विराट कोहलीचा रोल महत्त्वाचा असणार आहे. घरच्या मैदानातील बांगलादेशसह न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात तो मागील सामन्यातील उणीव भरून काढून संघासाठी बहुमूल्य योगदान देण्यात यशस्वी ठरणार का? याकडे सर्वांच्या नजरा असतील.
Web Title: AUS vs IND Virat Kohli Started His Test Preparation Behind The Scene Photo Leaked Ahead Of Border Gavaskar Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.