ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 416 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा पहिला डाव 166 धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 251 धावांची आघाडी घेऊन पुन्हा मैदानावर फलंदाजीस उतरण्याचा निर्णय घेतला. या दुसऱ्या डावात डेव्हीड वॉर्नरनं एका विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत 7000 धावा करणारा तो 12वा फलंदाज ठरला. 19व्या धावांवर वॉर्नर माघारी परतला. पण, त्यानंतर मार्नस लॅबुश्चॅग्नेनं ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांनाही 2019मध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही.
2019मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- मार्नस लॅबुश्चॅग्ने 10 सामने - 1022 धावा
- स्टीव्ह स्मिथ 7 सामने - 857 धावा
- जो रूट 11 सामने - 774 धावा
- बेन स्टोक्स 10 सामने- 772 धावा
- मयांक अग्रवाल 8 सामने -754 धावा
- रोरी बर्न्स 11 सामने - 731 धावा
- डेव्हीड वॉर्नर 8 सामने - 646 धावा
- अजिंक्य रहाणे 8 सामने - 642 धावा
- विराट कोहली 8 सामने - 612 धावा