Join us  

पाक गोलंदाजांनी मॅचमध्ये रंगत आणली; पण पॅट कमिन्सची बॅट तळपली अन्...   

पॅट कमिन्सनं बॅटिंगमध्ये तोरा दाखवून देत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावत संघाला २ विकेट्सनं विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 5:19 PM

Open in App

AUS vs PAK 1st ODI, Australia won by 2 wkts Against Pakistan :  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर २०४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडल्याचा सीन निर्माण झाला होता. पण तळाच्या फलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्सनं बॅटिंगमध्ये तोरा दाखवून देत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावत संघाला २ विकेट्सनं विजय मिळवून दिला.

पाक गोलंदाजांनी सामन्यात आणलं ट्विस्ट

मेलबर्नच्या मैदाना नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाक कॅप्टन मोहम्मद रिझवान ४४ धावा, बाबर आझम ३७ धावा आणि तळाच्या फलंदाजीत नसीम शाहनं केलेल्या ४० धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने ४६.४ षटकात २०३ धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियन संघ या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज करेल, असे वाटत होते. पण पाक गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली.

ऑस्ट्रेलियन संघानं १३९ धावांत गमावल्या होत्या ६ विकेट्स अल्प धावसंख्येचा बचाव करताना पाकिस्तानी गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. शाहिन शाह आफ्रिदीनं मॅथ्यू शॉर्टच्या रुपात ऑस्ट्रेलियाला १९ धावांवर पहिला धक्का दिला. नसीम शाहनं जेक फ्रेसर-मॅकगर्कच्या रुपात पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले. २८ धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. स्टीव्ह स्मिथ ४४ (४६) आणि जॉश इंग्लिस ४९ (४२) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. हॅरिस राउफनं स्मिथला तर शाहिन शाह आफ्रिदीनं जॉश इंग्लिसला बाद करत सामन्यात रंगत आणली. १३९ धावांवर ऑस्ट्रेलियाने ६ विकेट गमावल्या होत्या. ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियन संघाच्या विकेट पडत होत्या. ८ बाद १८५ अशी अवस्था झाली होती. तिथून कॅप्टन पॅट कमिन्स याने सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ३१ चेंडूत ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तानबाबर आजम