pak vs aus series : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर यजमानांविरुद्ध पाकिस्तानने एक सामना जिंकला तरी ती मोठी बाब असेल असे पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने म्हटले. त्याच्या या विधानावरुन बलाढ्य ऑस्ट्रेलियाची क्रिकेट विश्वात असलेली दहशत समजते. मात्र, अक्रमच्या या विधानावरुन त्याच्याच सहकाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त करत माजी कर्णधार इम्रान खान यांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले. पाकिस्तान क्रिकेट संघ वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. पाकिस्तानच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चार नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल. तिथे तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होईल.
पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला पाकिस्तानी संघ तिथे एक जरी सामना जिंकू शकला तर ती मोठी गोष्ट असेल असे वसीम अक्रमने म्हटले. इमरान खान यांच्याकडून शिकल्याने अक्रम नेहमी काही ना काही बोलत असतो. पण, पराभव सोडा... जर अक्रमने पाकिस्तान क्रिकेट संघ जिंकेल असे म्हटले असते तर नक्कीच आमच्या देशातील युवा खेळाडूंना आत्मविश्वास मिळाला असता. एकूणच वसीम अक्रमने नकारात्मक विधान केल्याने अहमदने नाराजी दर्शवली.
वसीम अक्रमने दिला इशारामोहम्मद रिझवानसाठी कर्णधार म्हणून पहिलाच दौरा फार कठीण असेल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करणे हे एक मोठे आव्हान आहे खासकरुन वन डे क्रिकेटमध्ये... ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानला संधी असू शकते मात्र वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे खूपच कठीण जाईल. त्यामुळे मला वाटते की, पाकिस्तानने वन डे क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे. ऑस्ट्रेलियात तीन पैकी एक वन डे जिंकणे हीदेखील मोठी गोष्ट असेल, असे अक्रमने सांगितले.
पहिल्या वन डेसाठी पाकिस्तानचा संघ -मोहम्मद रिझवान (कर्णधार), अब्दुला शफीक, सैय अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान अली अघा, मोहम्मद इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा४ नोव्हेंबर, पहिला वन डे सामना ८ नोव्हेंबर, दुसरा वन डे सामना१० नोव्हेंबर, तिसरा वन डे सामना१४ नोव्हेंबर, पहिला ट्वेंटी-२० सामना १६ नोव्हेंबर, दुसरा ट्वेंटी-२० सामना१८ नोव्हेंबर, तिसरा ट्वेंटी-२० सामना