pak vs aus series : पाकिस्तान क्रिकेट संघ वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचा स्वीकार करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. पाकिस्तानच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चार नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल. तिथे तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होईल. पण, माजी खेळाडू वसीम अक्रमने पाकिस्तानी संघाला गंभीर इशारा दिला.
मेलबर्नमध्ये माध्यमांशी बोलताना अक्रमने पाकिस्तानी संघाला इशारा दिला. मोहम्मद रिझवानसाठी कर्णधार म्हणून पहिलाच दौरा फार कठीण असेल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करणे हे एक मोठे आव्हान आहे खासकरुन वन डे क्रिकेटमध्ये... ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानला संधी असू शकते मात्र वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे खूपच कठीण जाईल. त्यामुळे मला वाटते की, पाकिस्तानने वन डे क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे. ऑस्ट्रेलियात तीन पैकी एक वन डे जिंकणे हीदेखील मोठी गोष्ट असेल, असे अक्रमने सांगितले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ - वन डे - मोहम्मद रिझवान (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफीक, अफरत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसनबुल्लाह, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद खान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, शाहीन आफ्रिदी. ट्वेंटी-२० - मोहम्मद रिझवान (कर्णधार), अफरत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसनबुल्लाह, जुनैद खान, मोहम्मद आफ्रिदी, मोहम्मद खान, नसीम शाह, ओमेर युसूफ, शाहीबजादा फरहान, सलमान अली अघा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा४ नोव्हेंबर, पहिला वन डे सामना ८ नोव्हेंबर, दुसरा वन डे सामना१० नोव्हेंबर, तिसरा वन डे सामना१४ नोव्हेंबर, पहिला ट्वेंटी-२० सामना १६ नोव्हेंबर, दुसरा ट्वेंटी-२० सामना१८ नोव्हेंबर, तिसरा ट्वेंटी-२० सामना