Join us  

कांगारूंनी उतरवला तगडा संघ; ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पाकिस्तानची 'कसोटी', १४ तारखेपासून थरार

पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पोहचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 11:40 AM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पोहचला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ डिसेंबरपासून तीन सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी रविवारी यजमानांनी आपला संघ जाहीर केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात कांगारू पाकिस्तानशी भिडणार आहेत. तर, पाकिस्तानी संघ नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर शेजाऱ्यांची खरी 'कसोटी' असणार आहे. 

पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ  -पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, लॉन्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद,  मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी. 

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)दुसरा सामना - २६ ते ३०  डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान