Join us  

AUS vs SA: ऑस्ट्रेलियाविरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ बेक्कार हरला; कांगारूच्या संघाने तब्बल 182 धावांनी मिळवला विजय  

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:46 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. सोमवारपासून या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली. यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेतील पहिला सामना घेऊन विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात यजमान कांगारूच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत कांगारूच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. कॅमेरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेच्या डावात 5 बळी घेऊन आफ्रिकेला मोठे धक्क दिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्या डावात 68.4 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या डावाची शानदार सुरूवात केली. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 200 धावांची द्विशतकी खेळी केली. उस्मान ख्वाजा (1), मार्नस लाबूशेन (14), स्टीव्ह स्मिथ (85), ट्रेव्हिस हेड (51), कॅमेरून ग्रीन (नाबाद 51), लेक्स कॅरी (111), पॅट कमिन्स (4) आणि नॅथन लायन (25) धावा करून बाद झाला. यजमान संघाकडून वॉर्नर, स्मिथ आणि कॅरी यांनी उल्लेखणीय खेळी केली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 8 बाद 575 धावा केल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे सलामीवीर वॉर्नरला द्विशतकी खेळीमुळे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. 

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय ऑस्ट्रेलियाच्या संघाने आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर उभारला ज्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाला घाम फुटला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची देखील सुरूवात निराशाजनक झाली. टेम्बा बवुमाने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. सारेल एरवी (21), डीन एल्गर (0), थेउनिस डे ब्रुन (28), टेम्बा बवुमा (65), खाया झोंडो (1), काइल व्हेरेने (33), मार्को जॅन्सन (5), केशव महाराज (13), कगिसो रबाडा (3), एनरिक नॉर्तजे (नाबाद 8), लुंगी एनगिडी (19) धावा करून तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात केवळ 204 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर आफ्रिकेचा संपूर्ण संघ गारद झाला. नॅथन लायनने सर्वाधिक 3 बळी पटकावले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला, तर स्कॉट बोलंडला 2 बळी घेण्यात यश आले. यासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. यजमान कांगारूच्या संघाने तब्बल 182 धावा आणि 1 डाव राखून मोठा विजय मिळवला. 

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड. 

दुसऱ्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - डीन एल्गर (कर्णधार), सारेल एरवी, थेउनिस डे ब्रुन, टेम्बा बवुमा, खाया झोंडो, काइल व्हेरेने (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, लुंगी एनगिडी.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाडेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथ
Open in App