Join us  

Aus vs SA: मार्नस लाबुशेनला Live मॅचमध्ये सिगारेट ओढण्याची हुक्की? मागवले लायटर अन् मग काय झाले ते पाहा, Video 

Australia vs South Africa Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना सिडनी येथे खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:31 PM

Open in App

Australia vs South Africa Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना सिडनी येथे खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेवर आपली पकड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. मागील सामन्यात द्विशतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर १० धावांची खेळी करून माघारी परतला. यानंतर मार्नस लाबुशेन व उस्मान ख्वाजा यांनी डाव सावरला. सामना सुरू असताना लाबुशेनने अचानक सिगारेट ओढण्याचे हावभाव केले आणि लायटर मागवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लाबुशेनने सिगारेट ओढण्याचे हावभाव का केले आणि लायटर का मागवले, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडू 'कसोटी' संघात, 4 वर्षांनंतर केलं पुनरागमन

डावाच्या चौथ्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर १० धावांवर बाद झाला. यानंतर लाबुशेन आणि ख्वाजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दरम्यान, लाबुशेनने ड्रेसिंग रूममधून लायटर मागवण्यासाठी सिगारेट ओढण्याचे हावभाव केले. त्यामुळेच सहकाऱ्यांना लाबुशेनला नेमकं काय हवंय हे समजले. ऑस्ट्रेलियन संघाच्या एका खेळाडूने मैदानात लायटर आणले. लाबुशेनने सिगारेट पेटवण्यासाठी नाही, तर त्याच्या हेल्मेटच्या दुरुस्तीसाठी लायटर मागवले होते.  

खराब प्रकाशामुळे सामना थांबलाखराब प्रकाशामुळे, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ थांबवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने २  बाद १४७ धावा केल्या आहेत ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन  १५१ चेंडूंत १३ चौकारांसह ७९ धावा केल्या. ख्वाजा १२१ चेंडूंत ६ चौकारांसह ५४ धावांवर खेळत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकामारणे टोळी
Open in App