AUS vs WI 2nd Test : गॅबामध्ये ऑस्ट्रेलियाचे पुन्हा एकदा वस्त्रहरण होताना दिसतेय. दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने इथे ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती आणि २०२४ मध्ये वेस्ट इंडिज इतिहास नोंदवण्याच्या उंबरठ्यावर आहे. मिचेल स्टार्कच्या भेदक यॉर्करवर काल ज्या शामर जोसेफला ( Shamar Joseph) अंगठ्यातून रक्त वाहत मैदान सोडावे लागले होते. त्याच जोसेफने गोलंदाजीत कमाल करून दाखवली. कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात सलग १० षटकं फेकून त्याने ६ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजला आता विजयासाठी २ विकेट्स हव्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाला २९ धावांची गरज आहे.
२ मुलांचा बाप, बॉडिगार्डची नोकरी सोडून क्रिकेटपटू झाला; शामर जोसेफचा संघर्षमयी प्रवास
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ३११ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ९ बाद २८९ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात १९३ धावाच करता आल्या. किर्क मॅकेंझी ( ४१), एलिक अथआनाझे ( ३५) व जस्टीन ग्रीव्ह्स ( ३३) यांनी चांगला खेळ केला. शामर जोसेफच्या अंगठ्यावर चेंडू आदळल्याने त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी जावे लागले. नॅथन लियॉन व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
२१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्टेलियाला खास सुरुवात करता आली नाही. जोसेफने एकामागून एक असे ५ धक्के दिले. उस्मान ख्वाजा ( १०), कॅमेरून ग्रीन ( ४२), ट्रॅव्हिस हेड ( ०), मिचेल मार्श ( १०) व अॅलेक्स केरी ( २) यांना माघारी पाठवून ऑसींची अवस्था ६ बाद १३६ अशी केली. स्टीव्ह स्मिथ अर्धशतकासह एकटा खिंड लढवताना दिसला. त्याला मिचेल स्टार्कची साथ मिळाली. पण, अल्झारी जोसेफने ही जोडी तोडली आणि त्यानंतर शामरने आठवा फलंदाज माघारी पाठवला. जोसेफने १० षटकांत ६० धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ८ बाद १८७ धावा झाल्या होत्या आणि त्यांना २९ धावा अजून करायच्या आहेत. स्मिथ ७६ धावांवर खेळतोय.
Web Title: AUS vs WI 2nd Test : salute Shamar Joseph's courage and resilience, Starc broke his toe yesterday, He was hobbling, still bowled 10 overs on trot and picked 6 wickets, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.