AUS vs WI 3rd ODI : ऑस्ट्रेलियातील कॅनबेरामध्ये AUS vs WI या संघात तिसरा वनडे सामना खेळवला गेला. या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला. अवघ्या ६.५ षटकांत ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य पार केले. सर्वाधिक चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजच्या संघाला २४.१ षटकांत ८६ धावांवर गारद केले.
या सामन्या दरम्यान मार्नस लाबुशेनची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याच्या डायव्हिंग कॅचने स्टेडिअममधील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर मार्नस लाबुशेनने त्याच्या क्षेत्ररक्षणाचे उत्कृष्ट कौशल्य दाखवले. शिवाय ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेतली, ती लाबुशेनच्या अफलातून झेलच्या जोरावर.
या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी पहिल्यांदाच खेळणाऱ्या झेवियर बार्टलेटने सलामीवीर केजॉर्न ऑटलीला पॅडवरला चितपट करत त्याला ८ धावांवर बाद केले. ११ व्या षटकात, मार्नस लाबुशेन बॅकवर्ड पॉईंटवर अविश्वसनीय असा कॅच घेतला. मार्नस लाबुशेनने घेतलेला कॅच पाहून सर्वच अवाक् झाले. केसी कार्टीला बाद केल्याने त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली.
वेस्ट इंडिजने ८६ धावा केल्या आणि त्यापैकी ३२ धावा या एलिक एथानाजे याने केल्या आहेत. रोस्टन चेस ( १२ ) व केसी कार्टी ( १०) यांना दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियाच्या झेव्हियर बार्टलेटने २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. लान्स मॉरिस व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सीन अबॉटने एक बळी टिपला. ऑस्ट्रेलियाकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्कने १८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. जोश इंग्लिसने १६ चेंडूंत नाबाद ३५ धावा कुटल्या. आरोन फिंच ( २) व स्टीव्ह स्मिथ ( ६*) यांनीही योगदान दिले.