Australia vs West Indies T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला सूर गवसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात आज वॉर्नरने स्फोटक खेळी केली, परंतु त्याची ही खेळी टीम डेव्हिडच्या ( Tim David) फटकेबाजीसमोर झाकोळली गेली. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc) पहिल्याच षटकात विंडीजला धक्का दिला. कायले मेयर्सने टोलावलेला वेगवान चेंडू स्टार्कने अचूक टिपला अन् सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२०त कॅमेरून ग्रीन व वॉर्नर ही जोडी सलामीला उतरवली. पण, ग्रीन १ धावा करून माघारी परतला. अॅरोन फिंच ( १५), स्टीव्ह स्मिथ ( १७), ग्लेन मॅक्सवेल ( १) हे अपयशी ठरले. वॉर्नर एका बाजूने दमदार खेळ करताना दिसला. त्याने ४१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ७५ धावा चोपल्या. त्यानंतर टीम डेव्हिडची बॅट तळपली. त्याने २० चेंडूंत ४१ धावांची खेळी केली. यापैकी ३४ धावा या त्याने ४ चौकार व ३ षटकार अशा ७ चेंडूंत चोपल्या. मॅथ्यू वेडने १६ धावांचे योगदान देताना ऑस्ट्रेलियाला ७ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचवले.
मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात विंडीजला धक्का दिला. 139kmph च्या वेगाने आलेला चेंडू कायले मेयर्सने तितक्याच चपळाईने समोर खेचला, परंतु स्टार्कने एका हाताने अफलातून रिटर्न कॅच घेतली. स्टार्कचा हा कॅच पाहून मेयर्सही स्तब्ध झाला. त्याला ६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर जॉन्सन ( २९) व ब्रेंडन किंग्स ( २३) यांनी विंडीजचा डाव सावरलेला, परंतु त्यांना अनुक्रमे कॅमेरून ग्रीन व अॅडम झम्पा यांनी बाद केले. कर्णधार निकोलस पूरन २ धावांवर स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि विंडिजची अवस्था ४ बाद ७३ अशी झालीय.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: AUS vs WI T20I : Caught & Bowled! Mitchell Starc drew first blood for Australia showing superb reflexes to dismiss Kyle Mayers, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.