Join us

"एक होता फास्ट बॉलर..." ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणाला, नातवंडांना सांगेन बुमराहच्या 'छान छान गोष्टी'

त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:51 IST

Open in App

जसप्रीत बुमराह अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. तो क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. तसेच माझ्या नातवंडांना या भारतीय वेगवान गोलंदाजाविरुद्ध सामना करण्याच्या आव्हानांविषयी सांगताना मला खूप आनंद होईल, असे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने सांगितले.

बुमराहसंदर्भात काय म्हणला ट्रॅविस हेड

बुमराहने पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. हेड याने सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, 'जसप्रीतला कदाचित या खेळातील सर्वांत महान गोलंदाजांपैकी एक मानले जाईल. सध्या आम्ही जाणून घेतोय की, तो आमच्यासाठी किती आव्हानात्मक ठरू शकतो. त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. भविष्यात जेव्हा मी माझ्या कारकिर्दीवर नजर टाकेल, तेव्हा माझ्या नातवंडांना मी कशाप्रकारे बुमराहचा सामना केला, हे गर्वाने सांगेन. त्यामुळेच बुमराहविरुद्ध खेळणे वाईट नाही. आशा आहे की, पुढेही मला त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल; पण त्याच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक आहे.' 

पुन्हा ते घडेलं असं वाटत नाही

पर्थ येथे ऑस्ट्रेलियाकडून केवळ हेडने अर्धशतक झळकावले होते. इतर फलंदाज अपयशी ठरले होते. याविषयी त्याने सांगितले की, 'हे नक्की आहे की, इतर फलंदाज माझ्याकडून कोणतेही टिप्स घेणार नाही. स्वतःची एक प्रत्येक खेळाडूची आपली शैली असते.' अ‍ॅडिलेड येथील २०२० सालच्या भारताविरुद्धच्या सामन्याविषयीही हेडने म्हटले. त्या सामन्यात भारतीय संघ केवळ ३६ धावांत गारद झाला होता. हेड म्हणाला की, 'मला आठवतंय, तो सामना लवकर संपला होता. आम्ही त्या सामन्याचा पूर्ण आनंद घेतला होता. पुन्हा अशी कामगिरी करणे चांगले ठरेल. पण, मला वाटत नाही असे यावेळी पुन्हा होईल.'

बुमराहमुळे फॉर्ममध्ये येता आले : सिराज

'मी कायम जस्सीभाईसोबत (जसप्रीत बुमराह) चर्चा करत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधीही मी त्याच्याशी माझ्या गोलंदाजीबाबत चर्चा केली होती. त्याने मला बळी मिळवण्यासाठी आतुर न राहता सातत्याने अचूक मारा करण्याचा सल्ला दिला. खेळाचा आनंद घेण्याचे सांगितले. जर, त्यानंतरही बळी नाही मिळाला, तरच चर्चा करण्याचे सांगितले,' असे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने म्हटले.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया