ढाका : आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसºया दिवसअखेर उभय संघांना विजयाची समान संधी असल्यामुळे रंगत कायम आहे. तिसºया दिवसअखेर आॅस्ट्रेलियाला विजयासाठी १५६ धावांची गरज आहे, तर बांगलादेशला ८ बळी घेण्याची आवश्यकता आहे. आजचा खेळ थांबला त्या वेळी अर्धशतकी खेळी करणाºया वॉर्नरला (७५) दुसºया टोकाकडून कर्णधार स्टीव्हन स्मिथ (२५) साथ देत होता. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असून येथे उर्वरित १५६ धावा फटकावणे आॅस्ट्रेलियासाठी आव्हान आहे. आॅस्ट्रेलिया संघाची भिस्त वॉर्नरसह कर्णधार स्मिथ यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.त्याआधी, पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी घेणाºया बांगलादेशने दुसºया डावात २२१ धावांची मजल मारली आणि आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी २६५ धावांचे आव्हान ठेवले. बांगलादेशच्या दुसºया डावात तमिम इक्बाल (७८), मुशफिकूर रहीम (४१), शब्बीर रहमान (२२) व मेहदी हसन (२२) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची सुरुवातीला २ बाद २८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर वॉर्नर व स्मिथ यांनी तिसºया विकेटसाठी ८१ धावांची अभेद्य भागीदारी करीत डाव सावरला. बांगलादेशतर्फे दुसºया डावात मेहदी हसन व शाकिब-अल-हसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत रंगत कायम, दोन्ही संघाला विजयाची संधी
आॅस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत रंगत कायम, दोन्ही संघाला विजयाची संधी
आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिस-या दिवसअखेर उभय संघांना विजयाची समान संधी असल्यामुळे रंगत कायम आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:29 AM