'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर

भारतीय संघाकडून पत्करावा लागलेल्या मानहानिकारक पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ विजयपथावर परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 12:57 PM2019-01-26T12:57:08+5:302019-01-26T12:57:26+5:30

whatsapp join usJoin us
Australia beat Sri Lanka by an innings and 40 runs on Day 3 at the Gabba | 'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर

'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्रिस्बन, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका : भारतीय संघाकडून पत्करावा लागलेल्या मानहानिकारक पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ विजयपथावर परतला. ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेला पहिल्या कसोटीत एक डाव व 40 धावांनी पराभूत केले. पॅट कमिन्सने दोन्ही डावांत मिळून दहा विकेट्स घेतल्या. 



श्रीलंकेचा पहिला डाव 144 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 323 धावा चोपल्या. मार्नस लॅबुश्चँग ( 81) व ट्रॅव्हीस हेड ( 84) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. श्रीलंकेची दुसऱ्या डावातही पडझड कायम राहिली. कमिन्सने 23 धावांत 6 विकेट घेत लंकेचा दुसरा डाव 139 धावांत गुंडाळून संघाला एक डाव 40 धावांनी विजय मिळवून दिला.



Web Title: Australia beat Sri Lanka by an innings and 40 runs on Day 3 at the Gabba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.