Join us  

चेहऱ्यावर चेंडू लागला अन् जमिनीवर कोसळला, LIVE सामन्यात खेळाडू रक्तबंबाळ (Video)

ऑस्ट्रेलियातील मार्श कप स्पर्धेत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:17 PM

Open in App

Accident on Cricket Ground Video Viral: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याची कल्पना कुणालाच नसते. क्रिकेटच्या मैदानात काही वेळा विक्रम रचले जातात तर काही वेळ काही विचित्र प्रसंगही ओढवताना दिसतात. सामने भारतातील असो किंवा भारताबाहेरील असोत, क्रिकेटच्या मैदानात अपघात होणे हे दुर्दैवी असते. नुकताच असा एक प्रकार क्रिकेटच्या मैदानावर घडला, त्यामध्ये एक वाईट चित्र समोर आले. ऑस्ट्रेलियन भूमीवर घडलेल्या ताज्या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओतील दुखापत झालेल्या खेळाडूच्या नाकातून रक्त वाहत होते. खेळाडू जखमी होऊन पडला. परिस्थिती इतकी बिकट झाली की खेळाडूला मैदानाबाहेर काढावे लागले.

नक्की काय घडले?

मार्श कपमधील सामना दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया यांच्यात रंगला. वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मॅचमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या व्हिक्टोरियाचा डाव थांबला, तेव्हा मैदानावर ही घटना घडली. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा खेळाडू हेन्री हंट क्षेत्ररक्षण करताना जे घडले ते वाईट होते. व्हिक्टोरियाच्या डावाचे २५वे षटक सुरू होते. त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर व्हिक्टोरियन फलंदाज थॉमस रॉजर्सने शॉट खेळला, त्यानंतर चेंडू वेगाने हवेत गेला. हा झेल घ्यायला हवा होता. पण, हेन्री हंटने चेंडू पकडताना त्याची चूक झाली. त्यावेळी चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला आणि नाकातून रक्त वाहू लागले.

खेळाडू जखमी होऊन जमिनीवर पडला आणि मैदानाबाहेर गेला. हेन्री हंटच्या चेहऱ्याला दुखापत झाली. जखमी हेन्री हंट काही काळ तेथेच जमिनीवर पडून होता. त्यानंतर टीम फिजिओ आणि डॉक्टरांना मैदानात यावे लागले. तपासणीअंती हेन्रीची प्रकृती ठीक नसल्याचे आढळून आले. तो अपार वेदनांनी ओरडत होता. परिणामी त्याला उपचारासाठी मैदानाबाहेर काढावे लागले.

ही घटना घडली तेव्हा व्हिक्टोरियाचा फलंदाज थॉमस रॉजर्स ६३ धावा करून खेळत होता. पण या अपघातानंतर तोही इतका विचलित झाला होता की त्याने आपल्या फलंदाजीवरही लक्ष केंद्रित केले नाही. तो फक्त 4 धावा करून आऊट झाला. दरम्यान, दक्षिण ऑस्ट्रेलियाने दिलेले 232 धावांचे लक्ष्य व्हिक्टोरियाने ३५ चेंडू राखून पूर्ण केले.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाअपघातसोशल व्हायरल