Luke Pomersbach : आंतरराष्ट्रीय सामने खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो. त्याला संघात जागाही मिळते. पण अनेक वेळा जागा मिळाल्यानंतरही पदार्पणाची वाट पाहावी लागते. पण मी तुम्हाला सांगतो की एक खेळाडू असा आहे जो आपल्या गर्लफ्रेंड सोबत सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता. पण सामना सुरू होण्यापूर्वीच त्याला स्टेडियममधून बोलावून थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करायला लावण्यात आले. ल्यूक पॉमर्सबॅक असे या खेळाडूचे नाव आहे.
पॉमर्सबॅकच्या पदार्पणाची कहाणी खूप रंजक आहे. 2007 च्याअखेरीस न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी पर्थमध्ये टी-20 सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यासाठी मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली 12 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघाची निवड करण्यात आली होती. त्यात यष्टीरक्षक अडम गिलख्रिस्टसह सहा फलंदाज होते. पण नाणेफेकीपूर्वी आघाडीचा फलंदाज ब्रॅड हॉगला अनफिट घोषित करण्यात आले. आता संघाकडे फक्त ५ फलंदाजीचे पर्याय शिल्लक होते.
त्यानंतर संघ व्यवस्थापनाला समजले की देशांतर्गत क्रिकेट खेळणारा ल्यूक पॉमर्सबॅक हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला आहे. त्याला लगेच ड्रेसिंग रूममध्ये बोलावण्यात आले. आधी त्याला ही सारी मस्करी वाटली पण नंतर गोष्ट गंभीर असल्याचे समजताच तो लगेच ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. घाईत पॉमर्सबॅक आपली कार लॉक करायला विसरला होता. त्याच्याकडे क्रिकेट किट नव्हते आणि भावाला घरून किट घेऊन स्टेडियममध्ये पोहोचायला उशीर झाला. पॉमर्सबॅकने तोपर्यंत इतर खेळाडूंकडून बॅट घेतली होती आणि इतर गोष्टीही घेतल्या होत्या. तो कसातरी T20 पदार्पण करण्यासाठी तयार झाला. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून पॉमर्सबॅकने 7 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 15 धावा केल्या. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
काही दिवसांपूर्वी त्याच्यावर बंदी घालण्यात आली- ल्यूक पॉमर्सबॅक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळत असे. काही दिवसांपूर्वी त्याला निलंबित केले होते. मद्यपानाच्या मुद्द्यावरून त्याच्यावर बंदी घालण्यात आली. या T20 सामन्याआधी न्यूझीलंडने क्रिकेट ऑस्ट्रेलिया अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळला होता. त्या सामन्यात पोर्सबॅकने 65 चेंडूत 88 धावांची खेळी केली होती.
IPL देखील खेळलाय- Luke Pomersbach IPL देखील खेळला आहे. 2008 मध्ये पंजाब किंग्सकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून शेवटचा खेळला. त्याने 7 सामन्यात 27.45 च्या सरासरीने आणि 122.76 च्या स्ट्राईक रेटने 302 धावा केल्या आहेत. 38 वर्षीय ल्यूक पोमर्सबॅकने 2014 पासून स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळलेला नाही.