Join us  

थरार...! ऑस्ट्रेलियाला हव्या होत्या ९ चेंडूंत ३२ धावा; टीम डेव्हिडने कसला चोपला भावा, Video

टीम डेव्हिड ( Tim David) मैदानावर उभा राहिला आणि त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करून ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 3:32 PM

Open in App

Australia chased down 216 runs in the first T20I - न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात वेलिंग्टन येथे मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडने ३ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पेलवणार असे वाटत होते आणि त्यांना शेवटच्या ९ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या. या परिस्थितीत टीम डेव्हिड ( Tim David) मैदानावर उभा राहिला आणि त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करून ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. 

फिन अॅलन व डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवताना ६१ धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कने सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फिनला ( ३२) माघारी पाठवले. त्यानंतर कॉनवे व रचीन रवींद्र या चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावा चोपल्या. कॉनवे ४६ चेंडूंत ६३ धावांवर, तर रवींद्र ३५ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ६८ धावांवर बाद झाला. ग्लेन फिलिप्स ( १९) व मार्क चॅम्पमन ( १८) यांनी योगदान दिले आणि संघाने ३ बाद २१५ धावा उभ्या केल्या.

प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेड ( २४) व डेव्हिड वॉर्नर ( ३२) जरा स्वस्तातच बाद झाले. कर्णधार मिचेल मार्शने वादळी खेळी करताना ४४ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ७२ धावा कुटल्या. ग्लेन मॅक्सवेल ( २५) व जोश इंग्लिस ( २०) हे बाद झाल्यावर टीम डेव्हिडने मोर्चा सांभाळला. ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या. मार्शने १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेऊने डेव्हिडला स्ट्राईक दिली. त्यानंतर डेव्हिडने बॅट सुसाट चालवली. त्याने ४,६,६ अशे अॅडम मिलनेची तीन चेंडू सीमापार पाठवले. 

६ चेंडूंत १६ धावा हव्या असताना टीम साऊदीच्या गोलंदाजीवरही त्याने प्रहार केला. शेवटच्या चेंडूवर ४ धावा हव्या असताना डेव्हिडने खणखणीत फटका खेचून ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. डेव्हिडने १० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्सने हा सामना जिंकला. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियान्यूझीलंडटी-20 क्रिकेट