अॅडिलेड - एकापाठोपाठ एक संकटांना तोंड देत असलेल्या आॅस्ट्रेलियाने अखेर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय नोंदवित पराभवाची मालिका खंडित केली. शिवाय यासह कांगारुंनी तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम राखले आहे.द. आफ्रिकेपुढे विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य होते. मात्र, त्यांचा संघ ५० षटकांत ९ बाद २२४ इतकीच मजल गाठू शकला. यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. उभय संघांदरम्यान रविवारी होबार्ट येथे निर्णायक सामना खेळला जाईल. द. आफ्रिकेने होबार्ट येथे पहिला सामना सहा गडी राखून जिंकला होता.मार्कस् स्टोइनिस याने शानदार मारा करीत दहा षटकांत ३८ धावांत तीन गडी बाद केले. त्यात सर्वाधिक ५१ धावा ठोकणाºया डेव्हिड मिलरचा देखील समावेश आहे.आॅस्ट्रेलियाचे फलंदाजदेखील लौकिकास्पद फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. त्यांचा डाव ४८.३ षटकांत २३१ धावांत आटोपला. कर्णधार अॅरोन फिंच ४१, अॅलेक्स केरी ४७ आणि ख्रिस लीन याचा ४४ धावांचा वाटा होता. गोलंदाजांनी मात्र कमी धावसंख्येचा सुरेख बचाव केला. मिशेल स्टार्कने ५१ धावांत दोन गडी बाद केले. त्याने तिसºया षटकात क्वींटन डिकॉकला बाद केले. मार्कराम(१८) तिसरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. जोश हेजलवूडने हेंड्रिक्सला तर स्टोइनिसने हेन्रिक क्लासेनला (१४) बाद करीत आॅस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या. फाफ डुप्लेसिस (४७) आणि मिलर यांनी ७४ धावांची भागीदारी केली. दोघेही बाद होताच विजयाच्या आशा क्षीण झाल्या.त्याआधी, आॅस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड (८) याला लवकर गमावले. शॉन मार्श (२२) आणि फिंच यांनी दुसºया गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. फिंचने ४१ धावांचे योगदान दिले. ख्रिस लिन (४४) टी२० च्या मूडमध्ये दिसला. त्याने रबाडाच्या चार चेंडूवर १८ धावा खेचल्या. दुसºया टोकाहून गडी बाद होत असताना कॅरीने देखील महत्त्वपूर्ण ४७ धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआॅस्टेÑलिया : ४८.३ षटकात सर्वबाद २३१ धावा (अॅलेक्स कॅरी ४७, ख्रिस लिन ४४, अॅरोन फिंच ४१; कागिसो रबाडा ४/५४, द्वैन प्रिटोरिअस ३/३२.)वि.वि. दक्षिण आफ्रिका : ५० षटकात ९ बाद २२४ धावा (डेव्हिड मिलर ५१, फाफ डूप्लेसिस ४७; मार्कस स्टोइनिस ३/३५, जोश हेजलवूड २/४२, मिशेल स्टार्क २/५१.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅस्ट्रेलियाकडून अखेर पराभवाची मालिका खंडित, दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात
आॅस्ट्रेलियाकडून अखेर पराभवाची मालिका खंडित, दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात
एकापाठोपाठ एक संकटांना तोंड देत असलेल्या आॅस्ट्रेलियाने अखेर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय नोंदवित पराभवाची मालिका खंडित केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 5:23 AM