T20 World Cup 2022 Squads: टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसह हे चार संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी

टी-20 विश्वचषक 2022 साठी आतापर्यंत 4 संघ जाहीर झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:11 PM2022-09-07T16:11:53+5:302022-09-07T16:15:07+5:30

whatsapp join usJoin us
Australia, England, South Africa and Netherlands have been announced as the 4 teams for the T20 World Cup | T20 World Cup 2022 Squads: टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसह हे चार संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी

T20 World Cup 2022 Squads: टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसह हे चार संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : लवकरच टी-20 विश्वचषकाचे (T20 World Cup 2022) बिगुल वाजणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत, 8 संघांनी आधीच पात्रता फेरी गाठली आहे. उरलेल्या आठ संघांमध्ये पहिले क्वालिफायर सामने खेळवले जातील आणि यापैकी पात्र ठरलेले चार संघ सुपर-12 च्या फेरीत खेळतील. यासाठी 4 संघांनी आपल्या संघांची देखील घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषकाचे यजमानपद असलेल्या ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम आपला संघ जाहीर केला होता. इंग्लंड आणि त्यानंतर मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सनेही आपला संघ जाहीर केला आहे.

नेदरलॅंड - स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन एकरमन, शरीझ अहमद, लोगान व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीड, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, मॅक्स ओ डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग. 

ऑस्ट्रेलिया - आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिंन्स (उपकर्णधार), श्टन एगर, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, डम झाम्पा. 

इंग्लंड - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम कुरेन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, लेक्स हेल्स. 

राखीव - लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन, टायमल मिल्स.

दक्षिण आफ्रिका - टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, कगिसो रबाडा, नरिक नॉर्तजे, रीझा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, प्रिटोरियस, रिल्ले रोसोउ, शम्सी, ट्रिस्टन स्टब्स. 

टी-20 विश्वचषकात सुपर-12 पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील. 

पहिला राउंड 
अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.

ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे. 

सुपर-12 फेरी
गट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.

गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता. 

 

Web Title: Australia, England, South Africa and Netherlands have been announced as the 4 teams for the T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.