Join us

१ कर्णधार, २ उप कर्णधार! ऑस्ट्रेलियाची रणनीती, पाकिस्तानची गोची करण्यासाठी प्रयोग

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:52 IST

Open in App

AUS vs PAK 1st Test : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतर वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडवर ( Travis Head) ऑस्ट्रेलियन संघाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या या संघाला दोन उप कर्णधार मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ भविष्याचा नेतृत्व तयार करण्यासाठी हा प्रयोग करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अनुभवी स्टीव्ह स्मिथ हे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे उप कर्णधार असणार आहेत. 

२९ वर्षीय ट्रॅव्हिस हेड याच्याकडे क्रिकेट ऑस्ट्रेलिया भविष्याचा कर्णधार म्हणून पाहत आहे. त्यामुळेच त्याला स्मिथच्या हाताखाली तयार होण्यास सांगितले गेले आहे. ऑस्ट्रेलियाने जुलैमध्ये ( वि. इंग्लंड) शेवटची कसोटी खेळली होती आणि त्या संघात एक बदल करून पाकिस्तानचा सामना करण्यासाठी अंतिम ११ खेळाडू निवडले गेले आहेत. टोड मर्फीच्या जागी दुखापतीतून सावरणारा नॅथन लियॉन उद्या खेळणार आहे.  

स्मिथ हा संघातील वरिष्ठ उप कर्णधार असेल आणि कमिन्सच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो पहिली पसंती असेल. मागील दोन वर्षात कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथने चार कसोटी सामन्यांत नेतृत्व सांभाळले होते. शिवाय तो २०१४ ते २०१८ या कालावधीत ३४ कसोटी सामन्यांत ऑसींचा कर्णधार होता. हेड यापूर्वीही सहाय्यक उप कर्णधार होता, जेव्हा टीम पेनकडे कसोटी संघाचे नेतृत्व होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये टीम पेनच्या नेतृत्वाखाली संघानेही दोन उप कर्णधार निवडले होते. तेव्हा कमिन्स व हेड यांनी मिचेल मार्श व जोश हेझलवूड यांना रिप्लेस केले होते.   

हेडने शेफिल्ड शिल्ड क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाने ६२ सामने खेळले आणि त्यात पहिल्या दोन सत्रांत संघांनी दोन फायनल खेळल्या. शिवाय लिस्ट ए क्रिकेट व बिग बॅश लीगमध्येही नेतृत्वाचा अनुभव हेडकडे आहे.  

ऑस्ट्रेलियाचा संघ ( Australia playing XI against Pakistan) : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स केरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड  

पाकिस्तानच्या संघात दोन पदार्पणवीरपाकिस्ताननेही पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आणि त्यांनी आमीर जमाल व खुर्रम शाहजाद यांना पदार्पणाची संधी दिली आहे.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाआॅस्ट्रेलियापाकिस्तान