ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. वन्यप्राण्यांनाही आपले जीव गमवावे लागले. या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. शिवाय जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या आगीत होरपळलेल्या जीवांना मदतीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसह अनेक टेनिसपटूही पुढे सरसावले आहे. ख्रिस लीननं बिग बॅश लीगमधील सामन्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या पुढाकारात ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डी'आर्सी शॉर्ट हे खेळाडूही सहभागी झाले. आता यात आणखी एका दिग्गज खेळाडूची भर पडली आहे. महान फिरकीपटू शेन वॉर्न त्याच्या 'Baggy Green'चं लिलाव करणार आहे.
ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत
ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूनं 145 कसोटी सामन्यांत घातलेल्या 'Baggy Green'चं म्हणजेच कॅपचे लिलाव करणार आहे. यातून जमा होणारा पैसा वॉर्न ऑस्ट्रेलियातील आगीतील पीडितांना देणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वॉर्ननं ही घोषणा केली. ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या कसोटीत 279 धावांनी विजय मिळवला.
टीम इंडियाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानाला धोका!''या भीषण आगीनं अनेकांचे कुटुंब उध्वस्त केलं. विशेषतः पक्षी प्राण्यांचे. कॅपच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम त्यांच्या कामी येईल, अशी अपेक्षा करतो,'' असे वॉर्न म्हणाला.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यातून ऑसी गोलंदाजांनी बराच निधी जमा केला. या कसोटीतील प्रत्येक विकेटमागे त्यांनी 1000 डॉलर दान केले.