ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. या आगीत 25 माणसांना आपले प्राण गमवावे लागले, परंतु त्याहून अधिक हानी ही प्राणी-पक्षांची झाली आहे. या आगीत 50 कोटीहून अधिक प्राणीपक्षी मृत पावल्याची माहिती समोर येत आहे. या अग्नीतांडवात होरपळलेल्या जिवांच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे येत आहेत. क्रिकेटपटूंनीही आपापल्या परीनं पीडितांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यानेही आपल्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि 24 तासांत या कॅपसाठी 3 लाख डॉलरपर्यंतची बोली लागली आहे.
ऑस्ट्रेलिया आग : आई तुझं लेकरू... शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मादीला बिलगून होतं पिल्लू
सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत असलेल्या ख्रिस लीननं बिग बॅश लीगमधील सामन्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या पुढाकारात ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डी'आर्सी शॉर्ट हे खेळाडूही सहभागी झाले. प्रत्येक सामन्यात त्यांच्याकडून टोलावल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकारामागे हे फलंदाज 250 डॉलर पीडितांना देणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी सामन्यातूनही प्रत्येक विकेटमागे 1000 डॉलर असा निधी गोळा करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत
शेन वॉर्ननं सोमवारी बॅगी ग्रीन कॅपच्या लिलावाची घोषणा केली आणि 24 तासांत त्याच्यासाठी 3 लाख 15 हजार डॉलरची बोली लागली. कॅपचा लिलाव आणखी तीन दिवस चालणार आहे. वॉर्ननं 145 कसोटींत 708 विकेट्स घेतल्या आहेत.