Australia Tour of India : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील ८ खेळाडू या स्पर्धेनंतर भारतातच थांबणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ आज जाहीर केला. ऑस्ट्रेलियन संघ सध्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील जागा पक्की करण्यासाठी संघर्ष करतोय. त्यांना उशीरा का होईना सूर गवसला आहे, पण अजून त्यांची मोहीम संपलेली नाही.
२३ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथून भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ ही मालिका खेळणार आहे. डेव्हिड वॉर्रन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस आणि अॅडम झम्पा हे अनुभवी खेळाडू या संघाचे सदस्य आहेत. वर्ल्ड कप संघातील जोश इंग्लिस व सीन एबॉट यांच्यासह राखीव खेळाडू तनवीर संघा हेही भारतात राहणार आहेत.
आयपीएल स्टार टीम डेव्हिड, मॅट शॉर्ट व नॅथन एलिस हे या मालिकेसाठी भारतात येणार आहेत. पॅट कमिन्स हा मायदेशात परतणआर आहे. पाकिस्तान व वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला विश्रांती दिली गेली आहे. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिचेल मार्श व कॅमेरून ग्रीन यांनी भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत न खेळण्याचे ठरवले आहे आणि तेही मायदेशासाठी रवाना होतील.
ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० संघ - मॅथ्यू वेड ( कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, सीन एबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा ( Australia T20I squad: Matthew Wade (c), Jason Behrendorff, Sean Abbott, Tim David, Nathan Ellis, Travis Head, Josh Inglis, Spencer Johnson, Glenn Maxwell, Tanveer Sangha, Matt Short, Steve Smith, Marcus Stoinis, David Warner, Adam Zampa)
मालिकेचे वेळापत्रक ( Schedule )
पहिली ट्वेंटी-२० - २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरी ट्वेंटी-२० - २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपूरम
तिसरी ट्वेंटी-२० - २८ नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथी ट्वेंटी-२० - १ डिसेंबर, नागपूर
पाचवी ट्वेंटी-२० ३ डिसेंबर, हैदराबाद
Web Title: Australia have announced a 15-player squad for their T20I series against India, check full Schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.