Australia announce squad for their ICC Men's T20 World Cup : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियानं आज संघ जाहीर केला. स्टीव्ह स्मिथ आणि अॅरोन फिंच यांच्या समावेशाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. स्मिथनं अॅशेस मालिकेला प्राधान्य देताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली होती, तर दुसरीकडे अॅरोन फिंच दुखापतीनं ग्रस्त असल्यानं त्याच्या खेळण्यावरही अनिश्चितता होती. पण, ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या संघात स्मिथ व फिंच या दोघांचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. (captain Aaron Finch and Steve Smith among a host of big names returning to action)
फिंच गुडघ्याच्या दुखापतीतून तर स्मिथ कोपऱ्याच्या दुखापतीतून सावरून संघात कमबॅक करणार आहेत. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांचेही संघात पुनरागमन होत आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघांत यांचा समावेश नव्हता. सात प्रमुख खेळाडू संघात परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे. पण, ऑस्ट्रेलियाला मागील पाच ट्वेंटी-२० मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वॉर्नर, फिंच, स्मिथ, मॅक्सवेल आणि स्टॉयनिस यांच्यासहे मिचेल मार्श, मॅथ्यू वेड व जोश इंग्लिस हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला बळकटी देणार आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज इंग्लिसकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसला तरी तो सलामीवीर आणि मधल्या फळीत उपयुक्त ठरू शकतो. अष्टपैलू डॅन ख्रिस्टीयन, डॅनिएल सॅम्स व जलदगती गोलंदाज नॅथन एलिस यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. ( All-rounders Dan Christian and Daniel Sams, and fast bowler Nathan Ellis have been named as travelling reserves.)
ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक२३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता२८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता३० ऑक्टोबर - ग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता४ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता६ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता