ऑस्ट्रेलियाची 'स्मार्ट' चाल! वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात बदल, तगड्या फलंदाजाची होणार एन्ट्री

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यासा अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि आयसीसीच्या नियमानुसार सहभागी देशांना आपापल्या संघात बदल करण्याची आजची डेड लाईन आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:34 PM2023-09-28T13:34:49+5:302023-09-28T13:35:46+5:30

whatsapp join usJoin us
Australia have suffered a huge blow as all-rounder Ashton Agar has been ruled out of the upcoming edition of the ODI World Cup, Marnus Labuschagne is under consideration as a potential replacement  | ऑस्ट्रेलियाची 'स्मार्ट' चाल! वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात बदल, तगड्या फलंदाजाची होणार एन्ट्री

ऑस्ट्रेलियाची 'स्मार्ट' चाल! वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात बदल, तगड्या फलंदाजाची होणार एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यासा अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि आयसीसीच्या नियमानुसार सहभागी देशांना आपापल्या संघात बदल करण्याची आजची डेड लाईन आहे. अशात ऑस्ट्रेलियालाही मोठा धक्का बसला आहे, परंतु त्यांनी त्याचं संधीत रुपांतर केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲस्टन ॲगरला ( Ashton Agar) दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार असल्याच्या बातम्या ऑस्ट्रेलियन मीडियाने दिल्या आहेत. भारतीय खेळपट्टीवर ॲस्टनचा फिरकी मारा उपयुक्त ठरला असता, परंतु त्याला आला माघार घ्यावी लागल्याने ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. 


ॲगरकडे १० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. २९वर्षीय ॲगरच्या पोटरीला दुखपात झाल्याचे दी डेली टेलेग्राफने म्हटले आहे. मागील बऱ्याच दिवसापासून ॲगरची पोटरी दुखत होती आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. वन डे मालिकेत तो परतला, परंतु पहिला सामना खेळल्यानंतर पुन्हा त्याच्या पोटरीच्या दुखापतीने डोकं वर काढलं. त्यानंतर तो त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मेलबर्नला परला आणि भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत नाही खेळला. ऑस्ट्रेलियाला ट्रेव्हिस हेड व नॅथन एलिस या दोन चांगल्या खेळाडूंना दुखापतीमुळे मुकावे लागले आहेच, त्यात ॲस्टनची भर पडली आहे. ॲगरने २०१५मध्ये वन डेत पदार्पण केले आणि २२ सामन्यांत २१ विकेट्स व ३२२ धावा केल्या आहेत. 


मार्नस लाबुशेनचे नाव येतंय पुढे....
ॲगरच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया त्यांच्या १५ सदस्यीय संघात बदल करण्याच्या तयारीत आहेत. ते मार्नस लाबुशेनला संधी देतील अशी चर्चा आहे. लाबुशेनला वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत तो कन्कशन खेळाडू म्हणून मैदानावर उतरला अन् संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने ती मालिका गाजवली आणि भारताविरुद्धची चांगली खेळी केलीय. त्यामुळे त्याच्या समावेशाने ऑसींचा संघ आणखी तगडा बनेल हे निश्चित आहे. 

Web Title: Australia have suffered a huge blow as all-rounder Ashton Agar has been ruled out of the upcoming edition of the ODI World Cup, Marnus Labuschagne is under consideration as a potential replacement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.