Join us  

ऑस्ट्रेलियाची अ‍ॅशेस मालिकेत २-१ अशी आघाडी

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ९१.३ षटकात १९७ धावांत संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 2:52 AM

Open in App

मँचेस्टर : पॅट कमिन्सने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक माºयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा पाचव्या दिवशी १८५ धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा व अखेरचा कसोटी सामना १२ स्पटेंबरपासून ओव्हल येथे खेळविण्यात येईल. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी यजमानांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ९१.३ षटकात १९७ धावांत संपुष्टात आला. कमिन्सने ४३ धावांत ४ प्रमुख फलंदाज बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. जोश हेजलवूड आणि नॅथन लियॉन यांनीही प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. इंग्लंडकडून सलामीवीर जो डेन्ली याने १२३ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा करत एकाकी झुंज दिली. कर्णधार जो रुट भोपळाही न फोडता बाद झाला, तर तिसºया सामन्यात निर्णायक शतक झळकावून इंग्लंडला एकहाती विजयी मिळवून देणारा बेन स्टोक्स केवळ एक धाव काढून परतला.

रविवारी २ बाद १८ धावांवरुन सुरुवात करणाºया इंग्लंडला अखेरच्या दिवशी केवळ १७९ धावाच करता आल्या. आॅसीच्या भेदक माºयापुढे इंग्लंडचे सर्वच प्रमुख फलंदाज ढेपाळले. पहिल्या डावात दिमाखदार द्विशतक ठोकणाºया स्टिव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया