Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:10 AM2020-03-20T10:10:40+5:302020-03-20T10:11:32+5:30

whatsapp join usJoin us
Australia legend Shane Warne’s company switches from producing gin to making hand sanitisers to combat coronavirus svg  | Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण आगीनंतर पुन्हा जनजीवर सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. तरीही सर्वांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पण, सध्या सॅनिटायझरच्या कमतरतेमुळे सर्व चिंतेत आहे आणि त्यांची चिंता मिटवण्याच्या दृष्टीनं शेन वॉर्ननं मोठा निर्णय घेतला आहे.

Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!

शेन वॉर्नची  SevenZeroEight Gin ही मद्य उत्पादन घेणारी कंपनी आता सॅनिटायझरचे उत्पादन करणार आहे. ७० टक्के अल्कोहोलचे प्रमाण असलेले हे सॅनिटायझर ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटल्समध्ये देण्यात येणार आहेत. वॉर्ननं एका निवेदनातून ही माहिती दिली आहे. ''शेन वॉर्न आणि त्यांचे दोन पार्टनर यांनी पुरस्कार विजेत्या SevenZeroEight gin चे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेत आहोत. त्याव्यतिरिक्त आम्ही आता पुढील सूचना मिळेपर्यंत सॅनिटायझर तयार करणार आहोत. पश्चिम ऑस्ट्रेलियातील दोन हॉस्पिटल्सना हे सॅनिटायझर पुरवण्यात येणार आहेत आणि तसा करारही झाला आहे,'' असे निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

कोरोना व्हायरसमुळे सध्या सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळेच कंपनीनं सामाजिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे, वॉर्नने सांगितले. तो म्हणाला,''ऑस्ट्रेलियन जनतेसाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि या व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आपण सर्व मिळून आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावण्याची गरज आहे. मला आनंद होतोय की माझी कंपनी आता याचा एक भाग होणार आहे.'' 


 

Web Title: Australia legend Shane Warne’s company switches from producing gin to making hand sanitisers to combat coronavirus svg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.