Join us  

मुंबई, पुणे, नागपूर येथे होणार एकदिवसीय लढती, वेळापत्रक जाहीर : आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड मालिका

सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या आणि पुढील महिन्यात होत असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:45 AM

Open in App

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या आणि पुढील महिन्यात होत असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले. यानुसार पहिल्यांदाच गुवाहाटी आणि तिरुवअनंतपुरम आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचे यजमानपद भूषवतील.आॅस्ट्रेलियाविरुद्धची ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका चेन्नई, कोलकाता, इंदोर, बंगळुरु आणि नागपूर येथे खेळविण्यात येईल. हे सामने अनुक्रमे १७, २१, २४, २८ सप्टेंबर आणि १ आॅक्टोबरला होतील. यानंतर, तीन सामन्यांची टी२० मालिका रांची (७ आॅक्टोबर), गुवाहाटी (१० आॅक्टोबर) आणि हैदराबाद (१३ आॅक्टोबर) येथे पार पडेल. तसेच, आॅस्टेÑलिया आणि अध्यक्षीय एकादश यांच्यातील सराव सामना १२ सप्टेंबरला चेन्नईला खेळविण्यात येईल.न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची सुरुवात सराव सामन्याने होईल. पहिला सराव सामना १७ आॅक्टोबरला तर दुसरा सराव सामना १९ आॅक्टोबरला मुंबई येथील सीसीआयच्या मैैदानावर होईल. या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २२ आॅक्टोबरपासून मुंबईतून सुरुवात होईल. यानंतर पुणे (२५ आॅक्टोबर) आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघ (२९ आॅक्टोबर) येथे पुढील दोन सामने होतील. या सामन्याचे स्थळ अद्याप ठरलेले नाही. तसेच, न्यूझीलंडविरुध्दची ३ सामन्यांची टी२० मालिका नवी दिल्ली (१ नोव्हेंबर), राजकोट (४ नोव्हेंबर) आणि तिरुवअनंतपुरम (७ नोव्हेंबर) येथे होईल. (वृत्तसंस्था)गांगुली ईडनच्या तयारीवर समाधानीकोलकाता : येथील ईडन गार्डनच्या मैैदानावर २१ सप्टेंबर रोजी होणाºया आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसºया एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याची तयारी पूर्ण झाली असून, या लढतीसाठी आम्ही तयार असल्याचे बंगाल क्रिकेट संघाचे (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ