England vs Australia, 1st ODI : ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर वन डे मालिकेत कमबॅक करण्यासाठी सज्ज असलेल्या ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात दमदार कमबॅक केलं. 23.4 षटकांत 5 बाद 123 धावा अशी अवस्था असूनही ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करताना मोठी मजल मारली. मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं समाधानकारक पल्ला गाठला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. पण, यात आर्चरनं ऑसी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा उडवलेला त्रिफळा हा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा Killer Look पाहिलात का? CSKनं पोस्ट केला खास फोटो
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑसीचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांना चांगली सुरुवात करता आली नाही. वॉर्नर चौथ्याच षटकात माघारी परतला... ट्वेंटी-20 मालिकेप्रमाणे वन डेतही आर्चरल ऑसी वॉर्नरवर भारी पडला. एका अप्रतिम चेंडूवर वॉर्नरचा त्रिफळा उडवला. त्याला काही समजण्यापूर्वी आर्चरने टाकलेला चेंडू बेल्स उडवून गेल्या. त्यानंतर मार्क वूडनं कर्णधार फिंचला ( 16) बाद केले. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टप्प्याटप्याने माघारी परतले होते. मार्कस स्टॉयनिसने 43 धावांची खेळी करून संघर्ष केला. पण, ऑसींची अवस्था 5 बाद 123 अशी झाली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार?
IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर...
Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!
आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!
विराट कोहली अन् RCB पाहतायेत IPL 2020 जेतेपदाचे स्वप्न, पण संघात आहे का तेवढा दम?