ब्रिस्टॉल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाच वेळा विश्वचषकाला गवसणी घालणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यापूर्वी सर्वांचे लक्ष दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरवर होते. पण तो आता पूर्णपणे फिट झाला असून तो या सामन्यात खेळणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या स्टीव्हन स्मिथवरही साऱ्यांचे लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही स्टार फलंदाजांवर चेंडू कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संघात आल्यानंतर हे दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये वॉर्नरने सर्वाधिक ६९२ धावा केल्या, तर स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावले.ऑस्ट्रेलियासाठी मागील वर्ष अनेक चढ-उताराचे राहिले. मात्र अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली संघाने उभारी घेतली असून विश्वचषक स्पर्धेत त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नर व स्मिथ यांना सन्मानपूर्वक स्थान दिले असले तरी त्यांना इंग्लंडमध्ये प्रेक्षकांच्या हुर्योला सामोेरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने ही घोषणा केली. वॉर्नरने तंदुरूस्ती चाचणी परीक्षा पास केली आहे. त्यामुळे 2015च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाची सलामीची जोडी पुन्हा धडाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, फिंचने फलंदाजीच्या क्रमवारीबाबत सस्पेंस ठेवला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांच्यात चढाओढ आहे.
ऑस्ट्रेलियासाठी मागील वर्ष अनेक चढ-उताराचे राहिले. मात्र अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली संघाने उभारी घेतली असून विश्वचषक स्पर्धेत त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नर व स्मिथ यांना सन्मानपूर्वक स्थान दिले असले तरी त्यांना इंग्लंडमध्ये प्रेक्षकांच्या हुर्योला सामोेरे जावे लागण्याची शक्यता आहे.ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स व मिशेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांसह जेसन बेहरेनडोर्फ , नाथन कूल्टर नाईल व केन रिचर्डसन असतील. अॅडम झम्पा व नॅथन लियोन यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे फिरकीला चांगले पर्याय आहेत. सराव सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
अफगाणिस्तानची ही दुसरी विश्वचषक स्पर्धा आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्यांनी कर्णधार बदलला आहे. असगर अफगाणऐवजी गुलबदन नायब याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. यामुळे संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज झाले. मात्र आता त्यांनी स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे.