Join us  

Australia vs Taliban: ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! Afghanistan बद्दल घेतला मोठा निर्णय

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये लादलेल्या नियमांविरोधात सुरू झालाय संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 4:27 PM

Open in App

Australia vs Taliban, Cricket: ऑस्ट्रेलियाने तालिबानी राजवटीला चांगलाच धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. ही मालिका मार्चच्या अखेरीस यूएईमध्ये खेळवली जाणार होती. मात्र तालिबानच्या काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डाने हे मोठे पाऊल उचलले असून मालिका खेळण्यास नकार दिला आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाला फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर यूएईमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही नियोजित होती. पण ऑस्ट्रेलियन संघ यापुढे ही मालिका खेळणार नाही.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आहे. त्यांनी आपल्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधने लादली आहेत. त्यांना अभ्यासासोबत घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाही. मुलींना खेळात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तालिबानच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने क्रिकेट मालिका न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन बोर्डाने आपल्या निवेदनात याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात, अफगाणिस्तानसह जगभरातील महिला आणि पुरुषांना खेळात आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सीए कटिबद्ध आहे. तसेच त्यांच्या देशातील महिला आणि मुलींची स्थिती सुधारण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

ICC नेही व्यक्त केली चिंता

CA ने देखील आपल्या ऑस्ट्रेलियन सरकारचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत. तो म्हणाला, "आमच्या निर्णयाला अफगाणिस्तानकडून मालिका रद्द करण्याच्या) समर्थन केल्याबद्दल धन्यवाद.' अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सीईओ ज्योफ अॅलार्डिस यांनीही अफगाणिस्तानमधील या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली.

अफगाणिस्तान संघाला ODI सुपर लीग अंतर्गत मिळणार गुण

अफगाणिस्तान हा ICC चा एकमेव पूर्ण सदस्य आहे, ज्यांचा महिला संघ नाही. १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचा समावेश करण्यात आलेला नाही. तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेबद्दल बोलताना, ते ICC एकदिवसीय सुपर लीग अंतर्गत खेळली जाणार होती. विजेत्या संघाला एकदिवसीय विश्वचषक अंतर्गत होणाऱ्या ICC  वन डे सुपर लीगचे गुण मिळवायचे होते. पण आता ऑस्ट्रेलियाने हे मालिका रद्द केल्याने मालिकेतील ३० टक्के गुण अफगाणिस्तानच्या खात्यात जमा होणार आहेत.

टॅग्स :ऑफ द फिल्डतालिबानअफगाणिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App