ऑस्ट्रेलियाने World Cup साठी उतरवला तगडा संघ; स्टार फलंदाजाला मात्र वगळलं!

भारतात वर्ल्ड कप असल्याने दोन दमदार फिरकीपटूंना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:47 AM2023-09-06T08:47:08+5:302023-09-06T08:53:06+5:30

whatsapp join usJoin us
Australia squad announce for ODI World Cup 2023 Pat Cummins Steve Smith in Marnus Labuschagne excluded | ऑस्ट्रेलियाने World Cup साठी उतरवला तगडा संघ; स्टार फलंदाजाला मात्र वगळलं!

ऑस्ट्रेलियाने World Cup साठी उतरवला तगडा संघ; स्टार फलंदाजाला मात्र वगळलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia World Cup squad 2023: पाच वेळा एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाने यंदाच्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी १५ खेळाडूंचा संघ अंतिम केला आहे. ऑस्ट्रेलियाने या संघात अष्टपैलू एरॉन हार्डी, वेगवान गोलंदाज नॅथन एलिस यांना स्थान दिलेले नाही. त्याचबरोबर स्टार फलंदाज मार्नस लबुशेनचे वर्ल्ड कप 2023 खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स असेल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की 15 खेळाडूंची यादी तात्पुरती संघ आहे. या महिन्याच्या अखेरीस अंतिम 15 जणांचा संघ निश्चित केला जाईल. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क त्यांना नवीन चेंडूसाठी मदत करतील. त्याचवेळी बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून संघात शेवटच्या स्थानासाठी शॉन एबॉटला एलिसपेक्षा प्राधान्य देण्यात आले आहे. एश्टन अगर आणि एडम झाम्पा हे संघात फिरकीचे पर्याय असतील. झाम्पाला भारतात खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तो विश्वचषकात खूप धोकादायक ठरू शकतो.

ऑस्ट्रेलियाने विश्वचषक संघात मोठा बदल केलेला नाही. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड वरच्या फळीत असतील. त्याला अष्टपैलू मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन मधल्या फळीत आणि खालच्या मधल्या फळीत साथ देतील.

एलेक्स कॅरी यष्टिरक्षक असेल

एलेक्स कॅरी आणि जोश इंग्लिस हे संघातील दोन कीपर आहेत, परंतु 2019 मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या शेवटच्या विश्वचषकात प्रशंसनीय कामगिरीनंतर कॅरी हा यष्टिरक्षक म्हणून कर्णधार कमिन्सची पहिली पसंती असेल.

ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 3 वनडे खेळणार

ऑस्ट्रेलिया सध्या दक्षिण आफ्रिकेतील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करत आहे. त्याचवेळी, कांगारू संघ या महिन्याच्या अखेरीस भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर विश्वचषक स्पर्धा सुरू होईल.

ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक २०२३ साठीचा संघ: पॅट कमिन्स (क), स्टीव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, एश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, एडम झाम्पा, मिचेल स्टार्क

Web Title: Australia squad announce for ODI World Cup 2023 Pat Cummins Steve Smith in Marnus Labuschagne excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.