Australia World Cup Squad 2024: जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा झाली आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे. कांगारूच्या विश्वचषकाच्या संघात अष्टपैलू खेळाडूंची फौज असल्याचे दिसते. तर ग्लेन मॅक्सेवल आणि ॲडम झाम्पा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. खरे तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा जेक फ्रेजर-मॅकगर्कला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले नाही. दिल्लीचा सलामीवीर असलेला मॅकगर्क स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो.
सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेला ट्रॅव्हिस हेड देखील कांगारूच्या संघाचा हिस्सा आहे. याशिवाय त्यांच्या वन डे संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला देखील संघात जागा मिळाली आहे. कमिन्स आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाची धुरा सांभाळत आहे. आयपीएलमध्ये धावांसाठी संघर्ष करत असलेले ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन हेही विश्वचषकाच्या संघात आहेत.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अर्गर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ -
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
Web Title: Australia squad for T20 World Cup 2024 Mitch Marsh to captain and Steve Smith and Jake Fraser-McGurk misses out, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.