Australia squad for the T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ जाहीर; IPLमध्ये Sara Tendulkar ज्याची बॅटींग पाहून झालेली क्रेझी त्याला मिळाली संधी 

Australia squad for the T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाने जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांच्या तगड्या १५  खेळाडूंना मैदानावर उतरवले आहे. यात एका मॅच विनर खेळाडूची भर पडल्याने ऑसींचे पारडे आधीच जड झाले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 08:24 AM2022-09-01T08:24:42+5:302022-09-01T08:25:09+5:30

whatsapp join usJoin us
Australia squad for the T20 World Cup 2022:  Cricket Australia has announced their 15 member squad for T20 World Cup & Tour of India, Tim David included in the squad | Australia squad for the T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ जाहीर; IPLमध्ये Sara Tendulkar ज्याची बॅटींग पाहून झालेली क्रेझी त्याला मिळाली संधी 

Australia squad for the T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ जाहीर; IPLमध्ये Sara Tendulkar ज्याची बॅटींग पाहून झालेली क्रेझी त्याला मिळाली संधी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia squad for the T20 World Cup 2022: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १५  सप्टेंबर ही आहे आणि त्यामुळेच आता सर्व सहभागी संघ त्यांच्या संघाची घोषणा करतील. याची सुरुवात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाने जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांच्या तगड्या १५  खेळाडूंना मैदानावर उतरवले आहे. यात एका मॅच विनर खेळाडूची भर पडल्याने ऑसींचे पारडे आधीच जड झाले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून वादळी खेळी करणाऱ्या टीम डेव्हिडला ( Tim David) ऑस्ट्रेलियाने संधी दिली आहे. हाच संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. पण, भारत दौऱ्यावर डेव्हिड वॉर्नरच्या जागी कॅमेरून ग्रीन संघाचा सदस्य असणा आहे, 

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑसींनी निवडलेल्या संघात लेग स्पिनर मिचेल स्वेपसनच्या जागी टीम डेव्हिडची निवड झाली आहे. २०२१च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात स्वेपसनचा समावेश होता. हा एकच बदल यंदाच्या वर्ल्ड कप संघात करण्यात आला आहे. टीम डेव्हिडने आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून ८ सामन्यांत १८६ धावा केल्या होत्या. 

टीम डेव्हिडची १८ चेंडूंत ४६ धावांची खेळी संपुष्टात आली अन् साराची रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली, Video

ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघः  अ‍ॅश्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स ( उपकर्णधार), टीम डेव्हिड, अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्स, मार्क्स स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर*, अ‍ॅडम झम्पा ( हा संघ भारत दौऱ्यावरही जाणार आहे, २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. वॉर्नरच्या जागी कॅमेरून ग्रीन भारत दौऱ्यावर जाईल) ( Australia’s T20 World Cup squad: Ashton Agar, Pat Cummins (vc), Tim David, Aaron Finch (c), Josh Hazlewood, Josh Inglis, Mitchell Marsh, Glenn Maxwell, Kane Richardson, Steve Smith, Mitchell Starc, Marcus Stoinis, Matthew Wade, David Warner*, Adam Zampa.  * Squad will also travel to India for three T20Is, September 20-26, except Warner will be replaced by Cameron Green)

कोण आहे टीम डेव्हिड?
भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या याला मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्स संघाने करारमु्क्त केलं. त्यामुळे मुंबईकडे हार्दिकच्या जागी तडाखेबाज फिनिशर कोण, असा सवाल होता. त्यात मुंबईने दुसऱ्या दिवशीच्या लिलावात मोठा डाव खेळत टीम डेव्हिडला ८.५ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. या  ६ फूट ५ इंच धिप्पाड खेळाडूला संघात स्थान दिलं. टीम डेव्हिड हा मूळचा सिंगापूरचा क्रिकेटपटू आहे. २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असून डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.

सिंगापूरचा टीम डेव्हिड IPL 2021मध्ये RCB च्या संघाकडून खेळला आणि आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू ठरला. डेव्हिडला IPL मध्ये केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. पण त्याने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने PSL मध्ये २९ चेंडूत ७१ आणि १९ चेंडूत नाबाद ५१ धावांची केलेली खेळी विशेष भाव खाऊन केली. बिग बॅश लीगमध्येही होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच रॉयल लंडन कप स्पर्धेतही त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७० चेंडूत नाबाद १४० आणि ७३ चेंडूत १०२ धावा अशी दोन शतकं झळकावली आहेत.

Web Title: Australia squad for the T20 World Cup 2022:  Cricket Australia has announced their 15 member squad for T20 World Cup & Tour of India, Tim David included in the squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.