सिडनी - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 4-0 च्या फरकानं फडशा पाडला आहे. सिडनी येथे रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 123 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीमध्ये उस्मान ख्वाजा आणि मार्श बंधूंनी चांगली गोलंदाजी तर पॅट कमिन्सने चांगली गोलंदाजी केली. काल 4 बाद 93 अशी अवस्था झालेल्या इंग्लंडला आज डावाने पराभव टाळण्यासाठी 210 धावांची गरज होती. परंतु त्यात जेमेतेम 87 धावांची भर घालून आज ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 88.1 षटकांत 180 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 4, नेथन लायनने 3, मिचेल स्टार्स आणि जेस हेझलवूड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
( आणखी वाचा - अॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा, इंग्लंडचा 4-0नं पराभव )
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने मार्श बंधूच्या शतकांच्या जोरावर चौथ्या दिवशी पहिला डाव ७ बाद ६४९ धावांवर घोषित करीत ३०३ धावांची आघाडी घेतली. काल चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी इंग्लंडची ४ बाद ९३ अशी अवस्था झाली होती. पहिल्या डावात ३४६ धावांची मजल मारणाºया इंग्लंडसाठी कर्णधार रुटची बोटाची दुखापत चिंतेचा विषय आहे. रुट दिवसअखेर ४२ धावा काढून नाबाद असून, त्याला जॉन बेयरस्टॉ १७ धावा काढून साथ देत आहे.
लियोनने १९ षटकांत ३१ धावांच्या मोबदल्यात अॅलिस्टर कुक (१०) आणि डेव्हिड मलान (०५) यांना बाद केले. त्याआधी, मिशेल स्टार्क ने मार्क स्टोनमॅनला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर लगेच कुक सुदैवी ठरला. मार्शने कुकचा झेल सोडला. त्या वेळी तो वैयक्तिक पाच धावांवर खेळत होता. या जीवदानाचा मात्र त्याला लाभ घेता आला नाही. लियोनच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. दरम्यान, कुक १० धावांच्या खेळीदरम्यान १२ हजार कसोटी धावा फटकाविणारा सहावा फलंदाज ठरला. त्याने या मालिकेत ३७६ धावा फटकावल्या. जेम्स विंस (१८) याला पॅट कमिन्सने बाद केले. त्याआधी, कालच्या ४ बाद ४७९ धावसंख्येवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियातर्फे मार्श बंधू एकाच डावात शतक ठोकणाºया बंधूंमध्ये तिसरी जोडी ठरली. यापूर्वी गे्रग व इयान चॅपेल आणि स्टीव्ह व मार्क वॉ यांनी आॅस्ट्रेलियातर्फे एकाच डावात शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा बंधूंनी एकाच डावात शतके ठोकली आहेत.
( आणखी वाचा - असं करणारा स्मिथ कसोटी इतिहासातला पहिला फलंदाज )
Web Title: Australia take on Ashes series, England beat England 4-0
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.